सेलू : १३२ केव्ही वीजकेंद्र अद्यापही प्रतीक्षेत असून शहरासह तालुक्यातील उद्योजक, व्यावसायिक, शेतकऱ्यांसह नागरिक विजेच्या लंपडावाने त्रस्त झाले आहेत. उष्णतेची लाट आणि अनियमित भारनियमनामुळे सर्व हैराण झाले आहेत.
लोकसंघर्षातून सेलू तालुका होऊन अनेक वर्षे लोटली; परंतु विजेसारखा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रतीक्षेत राहावे लागत आहे. शहरात व तालुक्यातील व्यापाऱ्यांनी भागभांडवल उभारून छोटे-मोठे उद्योग सुरू केले.
Beed News: विलंबामुळे २८ कोटींचा वाढीव भार ; ३७ किलोमीटर लांबीचा मार्ग; राजुरी-खरवंडी कासार महामार्ग आठ वर्षांपासून रखडलाया ठिकाणी जवळपास नऊ कापूस जिनिंग ॲण्ड प्रेसिंग, कापूस प्रक्रिया उद्योग आहेत. दरवर्षी तालुक्यातील व बाहेरून दरवर्षी लाखो क्विंटल कापूस येतो. हजारो हेक्टर कोरडवाहू शेतजमिनीला लोअर दुधना प्रकल्पामुळे सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली.
उद्योग व शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत; परंतु शहराला व तालुक्याला फायदेशीर ठरेल, असा १३२ केव्ही वीजकेंद्र अस्तित्वात आले नाही. परतूर, पाथरी व जिंतूर येथील १३२ केव्ही वीज केंद्रांच्या वीज वितरणावर तालुक्याची मदार आहे.
Kolhapur Girl End Life : कल्याणीला भिती नववी नापास होण्याची, कोणालाही न सांगता तिने जे केलं ते धक्कादायक; कोल्हापुरातील घटनेने हळहळकाही भागात कमी दाबाने वीजपुरवठा होतो. या भागातील नागरिक त्रस्त आहेत. ऐन हंगामात पाणी असूनही विजेअभावी उद्योग व शेतीला मोठा फटका सहन करावा लागतो. सेलू शहरातील दोन व ग्रामीण भागातील वालूर, धामणगाव, कान्हड, ढेंगळी पिंपळगाव, नांदगाव, चिकलठाणा, हादगाव, आदी ३३ केव्ही उपकेंद्रात शहरातील जवळपास ११ हजारचा वर तर ग्रामीण भागात जवळपास १० हजार ग्राहक आहेत.
वाट पाहुनी जीव शिणला...शहरात जवळपास ५० औद्योगिक ग्राहक आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीपंपांना जवळपास ५० ते ६० हजार युनिट विजेची आवश्यकता असते. यासाठी जिंतूर, परतूर व पाथरी शहरातील १३२ केव्ही वीज केंद्रांतून वीज पुरवठ्यासाठी अक्षरशः वाट पाहावी लागते.