IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI
esakal May 03, 2026 11:45 PM

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रविवारी (३ मे) दोन सामने होत असून दुसरा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होत आहे. हा सामना गुजरातच्या घरच्या मैदानात नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना पंजाबचा हंगामातील ८ वा सामना आहे, तर गुजरातचा १९ वा सामना आहे.

या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकली असू प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंजाबचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरतील.

IPL 2026: कोलकाताने अखेर रोखला हैदबादचा विजयरथ! रघुवंशीचं अर्धशतक, तर रहाणेची भक्कम साथ; KKR चं आव्हान जिवंत

दरम्यान दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे. गुजरातने प्लेइंग इलेव्हनमध्ये २२ वर्षीय अष्टपैलू निशांत सिंधू याला संधी दिली आहे. हे त्याचे आयपीएल पदार्पण असेल. तसेच पंजाबनेही संघात बदल करताना झेव्हियर बार्टलेटला संधी दिली असून विजयकुमार वैशाखच्या जागेवर त्याला संधी देण्यात आली आहे.

प्लेइंग इलेव्हन -

पंजाब किंग्स : प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), प्रियांश आर्य, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, सूर्यांश शेडगे, नेहल वढेरा, मार्को यान्सिन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, विजयकुमार वैशाख, मुशीर खान, मिशेल ओवेन

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, साई सुदर्शन, जॉस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, निशांत सिंधू, जेसन होल्डर, रशीद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुतार

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - राहुल तेवतिया, ग्लेन फिलिप्स, अनुज रावत, कुलवंत खेजरोलिया, कुमार कुशाग्रा

पंजाब किंग्सने या हंगामात अद्याप एकच पराभव स्वीकारला आहे, तसेच एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे सध्या ते ६ विजयांसह १३ गुण मिळवत अव्वल क्रमांकावर आहेत. गुजरातची कामगिरी मात्र संमिश्र राहिली असून त्यांनी ९ सामन्यांत ५ विजय आणि ४ पराभव स्वीकारले आहेत. त्यामुळे ते १० गुणांसह ५ व्या क्रमांकावर आहेत.

IPL 2026 नंतर मुंबई इंडियन्स रोहित शर्माला मुक्त करणार? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या... आमने-सामने आकडेवारी

गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स संघात आत्तापर्यंत ७ सामने खेळवण्यात आले आहेत. यातील ३ सामने गुजरातने, तर ४ सामने पंजाब किंग्सने जिंकले आहेत. यंदाच्या हंगामातील या दोन संघातील हा दुसरा सामना आहे. यापूर्वी पंजाब किंग्सने पहिल्या सामन्यात ३ विकेट्सने विजय मिळवला होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.