व्हॉट्सअप (WhatsApp) चा वापर करणाऱ्या कोट्यवधी युजरसाठी महत्वाची बातमी आहे. व्हॉट्सअप आता एक असे फिचर हटवणार आहे जे अनेक युजर्सना खूप पसंद होते. मात्र, बरेच लोक या फिचरचा वापर करत नव्हते, त्यामुळे आता हा हे फिचर्स हटवले जाणार आहे. मेटाने या निर्णयानंतर युजर्स आता आपला डिजिटल अवतार बनवू शकणार नाहीत आणि त्यांच्या प्रोफाईलमध्ये याचा वापर करु शकणार नाही. हा बदल हळूहळू रोलआऊट होत आहे.त्यामुळे अनेक युजर्सना याचा अंदाज देखील आलेला नाही.
डिजिटल अवतार बनवण्यास रोखWABetaInfo च्या बातमीनुसार व्हॉट्सअपने आधी युजर्सना आपला डिजिटल अवतार बनवण्याची सुविधा दिली होती. त्यात युजर्स आपला चेहरा, हेअरस्टाईल आणि कपड्यांना कस्टमाईज करु शकत होते. हे फिचर प्रोफाईल फोटोसोबत दिसत होता आणि स्टीकरच्या रुपात वापर करता येत होता. परंतू आता हे फिचर हळूहळू ऐपमधून हटवला जात आहे. सेटिंग्स, चॅट इन्फो आणि किबोर्डवरुन अवतारचा पर्याय गायब होत आहे. बातम्यानुसार अनेक युजर्सना नोटिफिकेश देखील मिळत आहे की अवतार एडिटिंग आता उपलब्ध होणार नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की येणाऱ्या काळात हे फिचर संपूर्ण समाप्त होत आहे आणि युजर्स या एक्सेस करु शकणार नाही.
हळूहळू फिचर हटवणारव्हॉट्सअप या बदलांना एक साथ लागू करत नाहीए, त्याऐवजी टप्प्या टप्प्यात रोल आऊट केले जात आहे. हेच कारण आहे की अनेक युजर्सना आतापर्यंत कोणताही बदल नजर येत नाहीए. WABetaInfo च्या बातमीनुसार अनेक युजर्सच्या ऐपमध्ये अवतार सेक्शन संपूर्णपणे गायब झाले आहे. येणाऱ्या आठवड्यात हा बदल सर्व युजर्सपर्यंत पोहचेल.मात्र, दिलासाची बाब म्हणजे आधीपासून वापर करत असलेले अवतार स्टीकर लागलीच हटवले जाणार नाहीत. चॅटच्या फेव्हरेट वा रिसेंट सेक्शनमध्ये अवतार फिचर काही वेळ राहील आणि युजर्स त्याचा वापर करु शकतील.
हे फिचर का हटवले जात आहेव्हॉट्सअपने अधिकृतपणे या फिचरला हटवण्याचे कारण सांगितलेले नाही. परंतू या मागचे कारण स्पष्ट नजरेस येत आहे. हे फिचर इतके लोकप्रिय झाले नव्हते जेवढी अपेक्षा केली जात होती. बहुतांशी युजर्स प्रोफाईल फोटो, इमोजी आणि साधारण स्टीकरचा वापर करणे पसंद करत होते. त्यामुळे कमी वापर होणाऱ्या फिचर्सना हटवणे कंपनीसाठी स्वाभाविक पाऊल मानले जात आहे.आता व्हॉट्सअप आपल्या प्लॅटफॉर्मला सोपे आणि जास्त उपयोगी बनवण्यावर लक्ष देत आहे. त्यामुळे युजर्सना गरज असणारे फिचर्सच मिळावे आणि ज्यामुळे ऐपचा अनुभव चांगला होऊ शकेल.