Tamil Nadu Election Result : तिरुपत्तूरमध्ये रंगला हायव्होल्टेज ड्रामा! फक्त 1 मताने ठरला आमदार; थलपती विजयच्या उमेदवारानं मंत्र्याचा पराभव करत रचला इतिहास
esakal May 05, 2026 01:46 PM

Tamil Nadu Election 2026 One Vote Victory : तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत मंत्र्यालाही पराभवाची चव चाखवली आहे. सोमवारी (ता.४) जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तामिळनाडूतील निकाल विशेषतः रोमांचक (Vijay TVK party election performance) ठरले.

अभिनेता विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने पहिल्याच निवडणुकीत दमदार एन्ट्री करत तब्बल १०८ जागांवर विजय मिळवला. ही कामगिरी त्यांच्या पक्षासाठी अत्यंत उल्लेखनीय मानली जात आहे.

Thalapathy Vijay Victory : 40 वर्षांचा अनुभव अन् अचूक टायमिंग! कोण आहेत ज्योतिषी राधन पंडित? ज्यांनी 'थलपती'च्या विजयाचं केलं होतं भाकीत?

तिरुपत्तूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल मात्र सर्वाधिक चर्चेत राहिला. येथे TVK चे उमेदवार श्रीनिवास सेतुपती यांनी डीएमकेच्या उमेदवाराचा केवळ एका मताच्या फरकाने पराभव केला. विशेष म्हणजे, पराभूत उमेदवार के. आर. पेरियाकरुप्पन हे स्टॅलिन सरकारमधील मंत्री होते.

Tirupattur election result minister defeat

या मतदारसंघात झालेली चुरशीची लढत मतमोजणीच्या तब्बल ३० फेऱ्यांपर्यंत रंगली. अखेरीस सेतुपती यांना एक मत जास्त मिळाल्याने त्यांचा विजय निश्चित झाला. सेतुपती यांना एकूण ८३,३७५ मते मिळाली, तर पेरियाकरुप्पन यांचा केवळ एका मताने पराभव झाला.

Communist Politics Crisis : बंगाल, त्रिपुरापाठोपाठ आता केरळही हातातून निसटलं? भारतीय राजकारणातून डाव्यांचा 'द एन्ड'? 50 वर्षांत CPI (M) च्या घसरणीची धक्कादायक कहाणी

हा निकाल दाखवून देतो की, निवडणुकीत प्रत्येक मत किती महत्त्वाचे असते आणि एका मतामुळेही विजय-पराभवाचे समीकरण बदलू शकते. दरम्यान, राज्यातील इतर निकालांमध्येही मोठे उलटफेर पाहायला मिळाले. अभिनेता विजय यांनी पेरांबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व या दोन्ही मतदारसंघांत विजय मिळवला. त्यांच्या पक्षाने २३४ सदस्यीय विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे.

Asaduddin Owaisi Bengal Performance : ओवैसींचा बंगालमध्ये 'फ्लॉप शो'; बिहारमधील यशाची जादू ममतांच्या बालेकिल्ल्यात का चालली नाही? 'इतक्या' जागा लढवल्या, पण हाती काय लागलं?

याच वेळी, डीएमकेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना कोलाथूर मतदारसंघात ८,७९५ मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या निकालांमुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत असून, विजय यांच्या नेतृत्वाखाली नवीन राजकीय अध्याय सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.