पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राजकीय घडामोडींसोबतच एका खास पदार्थाची जोरदार चर्चा रंगली आणि तो खास पदार्थ म्हणजे झालमुडी. रविवारी १९ एप्रिलला बंगालमधील एका निवडणूक रॅलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला ताफा थांबवून रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्या स्टॉलवर झालमुडीचा आस्वाद घेतला होता. या घटनेनंतर झालमुडी हा पदार्थ घराघरात पोहोचला. हा अस्सल बंगाली पदार्थ जगभरात लोकप्रिय झाला असून अनेक जण त्याची रेसिपी शोधू लागले आहेत. आज आपण हा पदार्थ नक्की कसा बनवतात, याची रेसिपी पाहणार आहोत.
झालमुडी हा पश्चिम बंगालमधील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड प्रकार आहे. कुरमुरे, मोहरीचे तेल आणि खास मसाल्यांच्या मिश्रणातून झालमुडी तयार होते. ही चव एकदा जिभेवर रेंगाळली की ती विसरणे कठीण असते. जर तुम्हालाही या तिखट, आंबट आणि कुरकुरीत झालमुडीची चव घरच्या घरी घ्यायची असेल तर ही सोपी पद्धत जाणून घ्या.
आवश्यक साहित्यझालमुडी बनवल्यानंतर ती लगेच सर्व्ह करा. जास्त वेळ ठेवल्यास कुरमुरे मऊ पडतात आणि त्याची मूळ मजा निघून जाते. चहाच्या वेळेस किंवा हलकी भूक लागल्यावर खाण्यासाठी हा एक उत्तम आरोग्यदायी आणि चविष्ट पर्याय आहे.