Marathi Entertainment News : सध्या मराठी सिनेविश्वात अनेक नवनवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. काही महिन्यांपूर्वीच अभिनेता, निर्माता श्रेयस तळपदेने त्याच्या आगामी मर्दिनी या सिनेमाची घोषणा केली. या सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. या पोस्टरवरील अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा लूक व्हायरल झाला आहे.
आई तारी त्याला कोण मारी अशी टॅगलाईन या पोस्टरला देण्यात आली आहे. तर पोस्टरवरील प्रार्थनाच्या लूकने लक्ष वेधून घेतलं आहे. हातात कुऱ्हाड, डोळ्यात अंगार आणि नराधमांचा नायनाट करण्यासाठी सज्ज असलेल्या आईच्या भूमिकेत प्रार्थना दिसते आहे. सोशल मीडियावर हे पोस्टर चर्चेत आहे.
View this post on InstagramA post shared by Prarthana Behere Jawkar (@prarthana.behere)
मर्दिनी सिनेमाची निर्मिती अभिनेता श्रेयस तळपदेची पत्नी दीप्ती तळपदे करते आहे. या सिनेमात प्रार्थना आणि श्रेयस बरोबर बालकलाकार मायरा वायकुळ तसेच अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी आणि राजेश भोसले यांच्या मुख्य भूमिका आहेत. अजय मयेकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.
मुंबई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत श्रेयसने या सिनेमाविषयी सांगितलं की,"आपण सिनेमा करताना फक्त कथा सांगत नाही, तर एक अनुभव घडवतो. 'मर्दिनी'ची सुरुवातही अशाच एका छोट्याशा, पण अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगातून झाली. आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटना आपण पाहतो, ऐकतो. त्या घटना काही वेळानं विस्मरणात जातात; पण अशा कथा 'डिलीट' होता कामा नयेतः त्या सांगितल्या गेल्याच पाहिजेत, असं मला नेहमी वाटतं. एका आईचा संघर्ष, तिच्या कुटुंबासाठीची झुंज आणि परिस्थितीसमोर न झुकणारी तिची जिद्द यांचा भावनिक प्रवास या चित्रपटातून पाहायला मिळणार असून, त्यामुळे हा सिनेमा मनोरंजनासोबतच प्रेरणादायी अनुभव देणारा ठरणार आहे."
3 जुलै 2026 ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. माझी तुझी रेशीमगाठ या सिनेमानंतर हे त्रिकुट बऱ्याच काळाने एकत्र येणार आहे. या सिनेमासाठी अनेकजण उत्सुक आहेत.
सैराट फेम अरबाज शेख अडकला लग्नबंधनात; गर्लफ्रेंडबरोबर गुपचूप उरकला निकाह, होतोय अभिनंदनाचा वर्षाव