ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण फ्लिपकार्ट येत्या काही दिवसातच एक मोठा सेल सुरू करणार आहे. फ्लिपकार्टने अधिकृतपणे नवीन सासा लेले सेल 2026 ची घोषणा केली आहे. हा सेल 9 मे पासून सुरू होईल, ज्यामध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, एअर कंडिशनर आणि अनेक घरगुती उपकरणांवर मोठी सूट दिली जाईल. फ्लिपकार्टने सेलच्या आधीच अनेक उत्पादनांची झलक दाखवायला सुरुवात केली आहे. बँक ऑफर्स, एक्सचेंज बोनस, नो-कॉस्ट ईएमआय आणि मर्यादित कालावधीसाठी फ्लॅश डील्स देखील उपलब्ध असतील.तसेच उन्हाळ्यासाठी नवीन खरेदीची योजना आखणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक उत्तम संधी असू शकते. चला तर मग आजच्या लेखात आपण या नवीन सासा लेले सेलमधील ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात.
मेगा सेल 9 मे पासून होणार सुरूफ्लिपकार्टने जाहीर केले आहे की, सासा लेले सेल हा 9 मे पासून सुरू होईल. कंपनीने आपल्या वेबसाइट आणि ॲपवर टीझर बॅनर आणि प्रीव्ह्यू लिस्टिंग प्रसिद्ध केली आहेत, ज्यामुळे ग्राहकांना उत्पादनांवरील आकर्षक डील्सची माहिती मिळेल. फ्लिपकार्टने ‘डील्स कमिंग सून’ हा विभागही सुरू केला आहे, जिथे वापरकर्ते त्यांची आवडती उत्पादने विशलिस्टमध्ये जोडू शकतात. यामुळे सेल सुरू झाल्यावर खरेदी करणे सोपे होईल. दरवर्षीप्रमाणे मर्यादित कालावधीसाठी अनेक विशेष ऑफर्स या सेल मध्ये असणार आहेत.
स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध असतील
ही सेल स्मार्टफोन खरेदीदारांसाठी उत्तम संधी घेऊन आली आहे. फ्लिपकार्टने सॅमसंग गॅलेक्सी एस25 सिरीजची झलक आधीच दाखवली असून, किंमतीत लवकरच कपात होण्याची शक्यता वर्तवली आहे. याव्यतिरिक्त प्रीमियम आयफोन मॉडेल्स आणि इतर अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती मिळण्याचीही शक्यता आहे. तर या सेलमध्ये आयफोन 17 हा 71 हजार 999 रूपयांमध्ये आणि गूगल पिक्सल 10 हा 60 हजार रूपयांपर्यंतच्या किमतीत खरेदी करता येईल. त्यासोबतच बँक सवलती, एक्सचेंज ऑफर्स आणि सुलभ ईएमआय पर्यायांमुळे ही डील आणखी खास बनेल. मिड-रेंज आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन श्रेणींमध्येही फ्लॅश सेल्स आयोजित केले जाऊ शकतात, ज्यामुळे नवीन फोन घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
टीव्ही आणि मोठ्या स्क्रीनच्या उपकरणांवर बचत
या फ्लिपकार्ट सेलमध्ये स्मार्ट टीव्हीदेखील एक प्रमुख आकर्षण असणार आहेत. प्रिव्ह्यू पेजवर 55-इंचाचा स्मार्ट टीव्ही दाखवण्यात आला आहे. सॅमसंगसह प्रमुख ब्रँड्सच्या टीव्हीवर भरीव सवलतींची अपेक्षा आहे. किमतीतील कपातीसोबत इन्स्टॉलेशनचे फायदे आणि पार्टनर ऑफर्स देखील दिल्या जाऊ शकतात. फ्लिपकार्टने टीव्हींचा एक खास कलेक्शन तयार केला आहे, ज्यामुळे ग्राहकांना विविध मॉडेल्सची सहज तुलना करता येईल. जर तुम्ही तुमच्या घरासाठी नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ असू शकते.
एसी आणि घरगुती उपकरणांवरही उत्तम सवलती
फ्लिपकार्ट एसी, वॉशिंग मशीन आणि इतर घरगुती उपकरणांवर आकर्षक डील्स देत आहे. कंपनीने त्यांच्या ‘Upcoming Deals on Appliances’ या विभागाद्वारे याची झलक दिली आहे. एसीसारख्या उन्हाळी उत्पादनांवर भरीव सवलती, एक्सचेंज बोनस आणि फायनान्सिंगचे पर्याय उपलब्ध असतील. याव्यतिरिक्त, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि लहान उपकरणांवरही आकर्षक ऑफर्स मिळतील. जर तुम्ही तुमच्या घरासाठी नवीन उपकरण खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या सेलद्वारे खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते.