Prajakta Mali On Marriage: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक, निर्माती, आणि उत्तम अभिनेत्री म्हणून मराठी मनोरंजन सृष्टीत ती लोकप्रिय आहे. शिवाय तिने दागिन्यांचा एक नवा ब्रँडही काढलाय. सोशल मीडियावरही प्राजक्ता सक्रिय आहे. ती कामाच्या आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स कायम देताना दिसते. अलीकडेच प्राजक्ताने instagram वर 'आस्क मी ' सेशन केलेलं. यामध्ये अनेक चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा तिने प्रयत्न केला. यात एका चाहत्याने विचारलेल्या लग्नाबद्दलच्या प्रश्नावर तिने दिलेल्या उत्तराची सध्या चर्चा आहे.
प्राजक्ता माळी सध्या 36 वर्षांची आहे. 'आस्क मी ' सेशनमध्ये अनेकांनी तिला वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्याविषयी प्रश्न विचारले. त्यात एकाने लग्न करण्यासाठीचा दबाव प्रेशर कसं मॅनेज करतेस ? कधी मागे पडल्यासारखं वाटतं का ?दडपण येता का? असा प्रश्न तिला एकाने विचारलेला. यावर प्राजक्ता माळीने तिच्या खास शैलीत उत्तर दिलं. ती म्हणाली ' मला असं वाटतं योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील .आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं .जे तुमचा आहे ते कधी ना कधी तुमच्याजवळ येणारच आहे . ' असं प्राजक्ता माळी म्हणाली. पुढे म्हणाली, आता घरच्यांनाही फिलॉसॉफी समजावून अवघड आहे. ते मला जमत नाही . "

प्राजक्ता माळीला चाहते कायम तू लग्न कधी करणार हा प्रश्न विचारत असतात. काही महिन्यांपूर्वी अशाच एका 'आस्क मी ' सेशन दरम्यान तुला तू लग्न कधी करणार हा प्रश्न विचारलेला. त्यावर तिने ' हम्म, हा खरं तर माझ्या आई वडिलांचा प्रश्न आहे, तुमचा प्रश्न नाही ' असं उत्तर दिलं होतं . यावेळेसही तिने तिच्या स्टाईलने उत्तर दिलंय. चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये तिने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. तिच्या आगामी प्रोजेक्ट विषयी हिंट दिली. तिचं हेल्थकेअर आणि स्किन रुटीनविषयीही तिने सांगितलं. एका नव्या भूमिकेत ती दिसणार असल्याची यामुळे चर्चा रंगली आहे. आता पुढचा प्रोजेक्ट कधी ? या प्रश्नावर 'जूनमध्ये कळेल' असं तिने उत्तर दिलं.