Sachin Pilgaonkar Praises Ranveer Singh: अभिनेता, दिग्दर्शक सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी केवळ मराठी नसून हिंदी सिनेसृष्टीतही (Entertainment) आपलं नाव गाजवलं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अभिनयासह गायनही केलं. रिअॅलिटी शोमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता. 'एकापेक्षा एक' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये त्यांनी परिक्षकाच्या खुर्चीवर बसून स्पर्धकांना मार्गदर्शन केलं. ज्यांचा परफॉर्मन्स त्यांना आवडायचा, त्यांना सचिन पिळगावकर हे आशीर्वाद आणि बक्षीस द्यायचे. त्यांचा वेगळा अंदाज होता. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचं कौतुक केलं. 'रणवीर सिंह (Ranveer Singh) जेव्हा कधी मला भेटेल, तेव्हा मी नक्की त्याला बक्षीस (Dhurandhar) देईन', असं सचिन पिळगावकर म्हणालेत.
वैभव मुंजालच्या पॉडकास्टमध्ये सचिन पिळगावकर यांना, 'आजच्या काळात कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याला बक्षीस द्यायला आवडेल?'असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सचिन पिळगावकर यांनी धुरंधर अभिनेता रणवीर सिंह याचं नाव घेतलं. यावेळी सचिन पिळगावर यांनी रणवीर सिंहच्या अभिनयाचं कौतुकही केलं. सचिन पिळगावकर म्हणाले, 'मला रणवीर सिंहचा अभिनय खूप आवडतो. 83 चित्रपटात रणवीर सिंहने खूप छान काम केलं आहे'.
'तो प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करतो. आणि त्याची ही सवय मला खूप आवडते. जे कलाकार अशाप्रकारे एखाद्या भूमिकेत समरसून जातात, असे कलाकार मला आवडतात', असं सचिन पिळगावकर म्हणाले. 'रणवीर सिंह मला जेव्हा कधी भेटेल, तेव्हा त्याला भेटून नक्की बक्षीस देईन. धुरंधरमध्येही त्यानं खूप छान काम केलंय. मला त्याचं काम आवडतं', असंही सचिन पिळगावकर म्हणाले.
यावेळी सचिन पिळगावकर यांनी रणवीर सिंहनं धुरंधर चित्रपटात साकारलेल्या पात्राचंही विशेष कौतुक केलं, 'धुरंधर या सिनेमाच्या पहिल्या भागात रणवीरनं जे पात्र साकारलंय, त्यावर मर्यादा होत्या. दुसऱ्या देशात जाऊन आपली ओळख लपवायची होती. रिव्हील नव्हती करायची. प्रत्येक गोष्टीत तो आपली ओळख लपवत होता. राग आला तरीही स्वत:वर कंट्रोल ठेवत होता. रणवीरनं जो अभिनय केला आहे, ते कौतुकास्पद आहे', असंही सचिन पिळगावकर म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या: