नाशिक, वडनेर भैरव : न्यायालयाच्या आदेशानुसार जमीन ताबा व नोंदी देण्याच्या कामासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना (Nashik mandal officer bribery case) मंडल अधिकारी योगिता आनंद भोये (वय ३८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी (ता. ५) करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या शेतजमिनीच्या ताब्याबाबत वाद सुरू होता. या प्रकरणात न्यायालयानेतक्रारदाराच्या बाजूने निर्णय देत जमीन ताबा व नोंदी देण्याचे आदेश महसूल विभागाला दिले होते. त्या अनुषंगाने संबंधित काम पूर्ण करण्यासाठी मंडळ अधिकारी योगिता भोये यांनी सुरुवातीला ६० हजार रुपयांची लाच मागितली होती.
Gokul Dudh Sangh Politics : 'गोकुळ'वर प्रशासक राज किती काळ? 63 वर्षांच्या इतिहासातील पहिल्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ, काय सांगतो नियम?तडजोडीनंतर ५० हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर सापळा रचून आरोपीला लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी, हवालदार विनोद चौधरी, अनिल गांगोडे, प्रमोद चव्हाणके आदींनी केली.