पुणे : पुण्यात सिंहगडावर पर्यटक दरीत कोसळला, त्याला बचाव पथकाने धाडसी मोहीमेनंतर वाचवलं आहे. सिंहगडावर सूर्यास्त पाहण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकाचा (Pune Sinhagad Fort Accident News) पाय घसरून तो सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. हवेली पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या तत्परतेमुळे पर्यटकाचा जीव वाचवण्यात (Pune Sinhagad Fort Accident News) यश आले आहे. योगेश मोहन शितोळे (वय ३५, रा. शिरूर) असे जखमी पर्यटकाचे नाव आहे. ते मंगळवारी सकाळी सिंहगड फिरण्यासाठी आले होते. दुपारी साडेचार ते पाचच्या सुमारास ते पश्चिमेकडील ‘हवा पॉईंट’ परिसरात सूर्यास्ताचे छायाचित्र घेण्यासाठी गेले होते. यावेळी गवतावरून पाय घसरल्याने ते सुमारे १५० ते १७० फूट खोल दरीत कोसळले.(Pune Sinhagad Fort Accident News)
दरीत पडल्यामुळे काही वेळातच त्यांची शुद्ध हरपली. सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी तत्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून आपण दरीत पडल्याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिस ठाण्यातील कर्मचारी अनिकेत काळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हवेली आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाशी संपर्क साधला. त्यानंतर बचाव पथक आणि हवेली पोलिसांचे कर्मचारी तातडीने सिंहगडावर दाखल झाले. बचाव पथकाने अंधारात आणि कठीण परिस्थितीत सुमारे १५० ते १७० फूट खोल दरीत उतरून योगेश शितोळे यांना सुरक्षितरीत्या वर आणले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, काल सिंहगड फिरण्यासाठी आलेले पर्यटक योगेश मोहन शितोळे वय 35 राहणार शिरूर हे सकाळी सिंहगड फिरण्यासाठी आले होते दुपारी साधारण साडेचार पाच वाजता ते सूर्यास्त पाहण्यासाठी पश्चिम दिशेला हवा पॉईंट या ठिकाणी दरिपाशी सूर्यास्ताचे फोटो घेण्यासाठी गेले होते पण काही वेळानंतर गवतावरतून त्यांचा पाय घसरून ते जवळपास खोल दीडशे फूट दरीमध्ये घसरत जाऊन पडले पडल्यानंतर काही वेळातच त्यांची शुद्ध हरपले व संध्याकाळी सात साडेसातला ज्यावेळेस त्यांना शुद्ध आली त्यावेळेस त्यांनी तात्काळ 112 ला कॉल करून दरीमध्ये पडल्याची माहिती दिली.
त्यानंतर हवेली पोलीस स्टेशनचे कर्मचारी अनिकेत काळे साहेब यांनी संबंधित घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ही माहिती हवी आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला दिले तात्काळ त्यांच्या बचावासाठी रेस्क्यू टीम व हवेली पोलीस स्टेशनचे कर्मचारी सिंहगडावरती दाखल होऊन साधारण 150 ते 170 फूट खोलदरीमध्ये जाऊन त्यांना सुरक्षितरीत्या दरीमधून वरती आणले व खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले व याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली.सहभागी झालेली रेस्कु टीममध्ये तानाजी भोसले, संतोष भगत, गणेश सपकाळ, संजय चोरघे, नाना जरंडे, कृष्णा मरगळे, उत्तम पिसाळ, वैभव भोसले, पोलीस अनिकेत काळे आणि प्रवीण तेलवाडे यांचा समावेश आहे.