इंदोरीकर महाराज पुन्हा चर्चेत आहेत, पण त्यांच्या वक्तव्यांमुळे नव्हे, तर चांगल्या अर्थाने चर्चेत आहेत. त्यांच्या लाडक्या मुलीचा, ज्ञानेश्वरी हिचा विवाह नुकातच पार पडला. 3 मे रोजी नवी मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती सुनील चिलप यांचे चिरंजीव साहिल चिलप यांच्याशी ज्ञानेश्वरीचं लग्न झालं. त्या लग्नाटा थाट, तयारी, सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत होते. इंदोरीकर महाराजांनी मुलीच्या लग्नात कोणतीही कसर सोडली, त्यामुळे तेही चर्चेत होते.(All photo : Social Media)
इंदोरीकर महाराज यांचे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलंय. त्याचं कीर्तन रटाळ नव्हे तर ते वेधक असतं. विनोदी कीर्तनाच्या शैलीतून व्यसनाधीनता, अंद्धश्रद्धा, कुटुंबात होणारे तंटे, गुन्हेगारी वर्तुळात तरूणांचा सहभाग याबद्दल इंदोरीकर महाराज बोलतात, जनजागृती करतात. त्यातून समाज प्रबोधन करण्याचे काम गेली चार दशके इंदोरीकर महाराज करत आहेत.
जग ज्यांना इंदोरीकर महाराज म्हणून ओळखतं, त्या इंदोरीकर महाराजांचं खरं नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख आहे. पण कीर्तन करत असल्याने त्यांना जग इंदोरीकर महाराज म्हणून ओळखतं. इंदोरीकर महाराज हे मूळचे अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यातील इंदोरी गावच आहेत. त्यामुळे गावाच्या नावावरूनच त्यांना इंदोरीकर महाराज म्हणून सर्व ओळखत आहेत. त्यांनाही आपली ही ओळख अभिमानास्पद वाटते.
इंदोरीकर महाराज इतर कीर्तनकारांप्रमाणेच उच्चशिक्षित आहेत. इंदोरीकर महाराज चक्क सायन्सचे पदवीधर आहे. त्यांनी बीएस्सी, बीएड केलंय. ते जर कीर्तनकार झाले नसते तर आदर्श शिक्षक म्हणून नावारुपाला आले असते. पण बऱ्याच डिग्री असूनही त्यांनी कीर्तन क्षेत्रात प्रवेश केला. आपल्या नर्म विनोदी शैलीतून समाजाचं प्रबोधन करण्यावर त्यांनी भर दिला. त्यांची ही नर्म विनोदी शैलीच त्यांची ओळख बनली. आपल्या नर्म विनोदी शैलीतून लोकांना हसवण्याचं काम इंदोरीकर महाराज करतात.
डॉ. नारायण महाराज जाधव यांना इंदोरीकर महाराज गुरु मानतात. डॉ. जाधव हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कर्जुले हरिया गावचे असल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांप्रमाणे त्यांचे गुरूही उच्चशिक्षित असून डॉ. जाधव यांनी बीएएमस केलं असून त्यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृत आणि तत्त्वज्ञानात त्यांनी एमए देखील केलंय. तसंच त्यांनी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतून त्यांनी अध्यात्माचे शिक्षण घेतलं होतं.