मुलीसोबत मैत्रीचा वाद विकोपाला, इंस्टाग्रामवर मेसेज करून भेटायला बोलावलं अन् संतापाच्या भरात जागीच तरुणाला संपवलं; नागपुरात खळबळ!
रजत वशिष्ठ, एबीपी माझा May 06, 2026 05:13 PM

Nagpur Crime News : नागपूरच्या गुन्हेगारी विश्वातून एक खळबळनक बातमी समोर आली आहे. एका मुलीसोबतच्या मैत्रीच्या वादातून नागपुरात एका 17 वर्षीय तरुणाची हत्या (Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. जोहरान मुस्ताक शेख असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने जोहरानला इंस्टाग्रामवर मेसेज करून कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील वाजपेयी नगर येथे काल (5 मे रोजी) मध्यरात्रीच्या सुमारास भेटायला बोलावले होते. या भेटीदरम्यान दोघांमध्ये एका मुलीसोबतच्या मैत्रीच्या कारणावरून वाद झाला. कालांतराने हा शाब्दिक वाद तीव्र झाल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात धारदार शस्त्राने जोहरानवर वार केले.

Nagpur Crime News : भेटायला बोलावलं अन् संतापाच्या भरात जागीच तरुणाला संपवलं; 

दरम्यान, हि बातमी परिसरात समजताच गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अशातच कळमना पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून पुढील तपास कळमना पोलीस करत आहे. मात्र या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Beed: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला वीस वर्षे सक्तमजुरी शिक्षा, दोन वर्षांनी मिळाला न्याय

दोन वर्षांपूर्वी कुर्डूवाडी येथे राहत्या घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला बार्शी सत्र न्यायालयाने वीस वर्षे सक्त मजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सध्या सर्वत्र अल्पवयीन मुलींवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर हा निकाल नक्कीच दिलासादायक मानला जात आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजे 1 जानेवारी 2024 च्या मध्यरात्री अकरा वाजता यातील नराधम लखन उर्फ बापू ज्योतिबा सावंत या 21 वर्षाच्या तरुणीने पीडीतीच्या घरात घुसून या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. मुलीने आरडाओरडा सुरू करतात कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी यात नराधमाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली होत.

यानंतर या नराधमावर कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने भारतीय दंड विधान कलम 376 (2) आणि बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायदा पोक्सो कलम 4 नुसार प्रत्येकी वीस वर्षे सक्त मजुरी आणि दंड सुनावला आहे. याप्रकरणी पीडीतेच्या आई आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. यावेळी सरकारी पक्षाकडून एडवोकेट दिनेश देशमुख यांनी बाजू मांडली. एकंदर नरसापुरसह सध्या समोर येणाऱ्या अनेक संतापजनक घटना पाहता बार्शी सत्र न्यायालयाने दिलेला निकाल हा नक्कीच दिलासादायक आणि आशादायी आहे.

Rohit Pawar : राज्यात दररोज सरासरी 24 बलात्काराच्या घटना, वर्षभरात तब्बल 50 हजार विनयभंगाच्या घटना

दुसरीकडे, राज्यात वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर त्यांनी सरकारवर टीका करत कडक कायद्याची मागणी केली. राज्यात दररोज सरासरी 24 बलात्काराच्या घटना घडत असून अशा गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पवार यांनी सांगितले. पोस्को अंतर्गत सुमारे 13 हजार प्रकरणे नोंदवली जातात, तर वर्षभरात तब्बल 50 हजार विनयभंगाच्या घटना घडत असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली. याशिवाय सुमारे दीड लाख महिला बेपत्ता प्रकरणे अद्याप प्रलंबित असल्याचेही त्यांनी नमूद केले.

चाकण, बीड, गोंदिया, बारामती, बदलापूर आणि मावळ येथील अत्याचाराच्या घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणांमध्ये त्वरीत न्याय मिळणे आवश्यक असल्यावर भर दिला. अनेक प्रकरणांमध्ये 90 दिवस उलटल्यानंतरही चार्जशीट दाखल होत नसल्याची बाब गंभीर असल्याचेही त्यांनी म्हटले. अत्याचार रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कडक कायदा आणण्याची गरज असल्याचे सांगत, यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्र सरकारने अद्याप आवश्यक कायदा मंजूर न केल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. यासोबतच अंधश्रद्धा विरोधी कायदा अधिक कडक करून प्रभावीपणे लागू करण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

इतर महत्वाच्या बातम्या

Pune Crime Parvati Case: 'तुम्ही कामाला गेल्यावर तात्या मला ओढून ओढून घ्यायचे', पर्वती प्रकरणातील मुलीने आई-वडिलांना सांगितली हादरवणारी कहाणी

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.