Virar Samuhik Lagna Sohla: विरारच्या जीवदानी देवी संस्थानतर्फे भव्य सामुदायिक विवाह सोहळा; २१ जोडपी विवाहबंधनात
esakal May 06, 2026 07:45 PM

विरार : आज सकाळ पासून वेगवेगळ्या थकांच्या वधू वरची आणि वराती मंडळींचे पाय विरारच्या जीवदानी मंदिराच्या पायथ्याकडे वळू लागले होते.निमित्य होते ते जीवदानी देवी संस्थानने आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आज मोठ्या थाटात हे वधुवर विवाह बंधनात अडकले.

या सोहळ्याची जययत तयारी संस्थानने केली होती मोठा होत सानी चौघडा लग्न विधीसाठी बोलावले भटजी आणि जमलेले वरती यांच्या साक्षीने आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.वधू वरांना जीवदानी देवी मंदिर संस्थान तर्फे मनी मंगळसूत्र,पोशाखा पासून संसार उपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आली.

त्याच प्रमाणे लायन्स क्लब तर्फे ही नवं दाम्पत्याने भेट वस्तू देण्यात आल्या या कार्यक्रमाला वसई विरारचे महापौर अजीव पाटील,माजी महापौर राजीव पाटील,विरोधी पक्ष नेता मनोज पाटील,नगरसेवक प्रशांत राऊत,सदानंद पाटील,रोहन सवलत,नरेंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्याचे यजमानपद जीवदानी देवी संस्थानचे अध्यक्ष प्रदीप तेंडुलकर व उपाध्यक्ष पंकज ठाकूर याणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भूषविले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.