ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 मे 2026 | बुधवार
एबीपी माझा ब्युरो May 06, 2026 08:43 PM

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 मे 2026 | बुधवार

1.शासकीय राजपत्रित अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी हिंदी परीक्षा सक्तीचा निर्णय मागे, मराठी भाषा मंत्री उदय सामंतांची घोषणा, 28 जून रोजीच्या परीक्षेला मनसेसह ठाकरेंच्या शिवसेनेने केला होता विरोध https://tinyurl.com/ysfasv56 

2. पुण्यातील पर्वती भागात माणुसकीला काळीमा फासणारी घटना, आजोबाकडूनच 9 वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार, आई-वडिलांकडून फाशीची मागणी, मोबाईल चोरीप्रकरणी वर्षभरापूर्वी जावयाने सासऱ्याची केली होती हकालपट्टी https://tinyurl.com/3muzvp3x  'तुम्ही कामाला गेल्यावर तात्या मला ओढून ओढून घ्यायचे', पर्वती प्रकरणातील मुलीने आई-वडिलांना सांगितली हादरवणारी कहाणी https://tinyurl.com/2vz6e5ev 

3. नसरापूर प्रकरणी नराधमाला घेऊन पहाटे पोलीस पोहोचले घटनास्थळी, अत्याचारानंतर चिमुकलीचा मृत्यू झाला की नाही पाहण्यासाठी छातीवर बुक्क्या मारल्याचा वैद्यकीय अहवालात उल्लेख https://tinyurl.com/25hbe9yy  नसरापुरातील ज्या गोठ्यात अत्याचार झाला तिथंच आरोपी 5-6 दिवस राहिला, अगोदर पासूनच तिच्यावर होती नजर, गाठी शेव खायला दिली अन् अत्याचार केला, धक्कादायक माहिती समोर https://tinyurl.com/t9mfw6sb 

4. घराच्या बांधकामासाठी 4 लाख आणण्यासाठी दोन वर्षे सासरच्यांनी छळले, 23 वर्षीय विवाहितेची आत्महत्या, अहिल्यानगर हादरले https://tinyurl.com/yeysx249  हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ, अहिल्यानगरमधील विवाहितेचं मृत्यूपूर्वीचं पत्र पोलिसांच्या हाती https://tinyurl.com/2ub9cy8f 

5. शाळेतील मार्कशीटवर खाडाखोड पाहताच बापाचं टाळकं सटकलं, चिमुरड्या लेकीला जीव जाईस्तोवर मारलं, पुण्यातील संतापजनक घटना https://tinyurl.com/yc44awk2   मुलीसोबत मैत्रीचा वाद विकोपाला, इंस्टाग्रामवर मेसेज करून भेटायला बोलावलं अन् संतापाच्या भरात जागीच तरुणाला संपवलं, नागपुरात खळबळ! https://tinyurl.com/36upyr4w 

6. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून हप्ते भरूनही वर्षापासून परतावा मिळेना, बँकांचे हप्ते फेडण्यासाठी मराठा समाजातील तरुण सावकाराच्या दारात https://tinyurl.com/22ke6fft 

7. सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा, दिल्लीत जाऊन उपराष्ट्रपतींकडे पत्र सादर, बारामती विजयानंतर तातडीने निर्णय https://tinyurl.com/2rvzknwu 

8. पश्चिम बंगालनंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, क्लीन स्वीप मोहीम राबवणार, कार्यकर्त्यांच्या ट्रेनिंगला सुरुवात https://tinyurl.com/26nxyr6m  ममतांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा न दिल्यास बंगालमध्ये सरकार कोणाचं? जेष्ठ विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी सांगितला कायदेशीर मार्ग https://tinyurl.com/yw6yk7y2 

9. अभिनेता विजयचा राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा, उद्या चेन्नईत घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, काँग्रेसने जाहीर केला पाठिंबा https://tinyurl.com/43uttz4r   केरळमध्ये सत्तास्थापनेसाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू, मुख्यमंत्रिपदासाठी रमेश चेन्निथलांचं नाव आघाडीवर https://www.youtube.com/watch?v=tcZa_PL8tSw 

10.  आयपीएलच्या प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याची ठिकाणं ठरली, अंतिम सामना बंगळुरू ऐवजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार, बीसीसीआयची मोठी घोषणा https://tinyurl.com/4thh298w  संजू सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय https://tinyurl.com/2s3kvbn7 

एबीपी माझा स्पेशल

'वंदे मातरम'ला मिळाला राष्ट्रगीताच्या बरोबरीचा दर्जा, केंद्रीय कॅबिनेटची प्रस्तावाला मंजुरी, तर 'वंदे मातरम'चा अपमान केल्यास तीन वर्षांपर्यंतचा कारावास अन् दंडाची तरतूद  https://tinyurl.com/mj4ruy47 

शेतऱ्यांसाठी खूशखबर! राज्यातील प्रत्येक टोल नाक्यावर कृषी मॉल उभारला जाणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा निर्णय https://tinyurl.com/3dt7ztks 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w  

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.