Anandi Marathi serial: स्टार प्रवाह वरील आनंदी मालिका सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेची सुरुवातीपासूनच चर्चा आहे. 16 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या मालिकेत आता एका नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे येड लागलं प्रेमाचं या मालिकेतील आपल्या भूमिकेमुळे लोकप्रिय ठरलेला अभिनेता आता आनंदी मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता अमर जाधव याने यापूर्वीही अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. 'करण गुन्ह्याला माफी नाही' या मालिकेतील त्याचा कावेबाज खलनायकी अवतार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. अमरचा भूमिकेमुळे या मालिकेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत.
वेड लागलं प्रेमाचं या मालिकेतील प्रशांत दाजी या भूमिकेत दिसलेला अभिनेता अमर जाधव आता आनंदी मालिकेत दिसणार आहे. या भूमिकेविषयी बोलताना अमर म्हणाला ' स्टार प्रवाह सोबत पुन्हा काम करताना मला खूप आनंद आणि उत्साह वाटतोय. अभय ही भूमिका प्रेक्षकांना नक्की आवडेल. तो वर्क विथ वर्कशीप या तत्वावर विश्वास ठेवणारा मुलगा आहे. परंतु त्याच्या याच स्वभावामुळे त्याच्या आयुष्यात अनेक अनपेक्षित घटना घडतात, ज्यामुळे कथेला वेगळी वर्ण मिळत आहेत. हे पाहायला प्रेक्षकांना नक्की आवडेल.'
अभिनेता अमर जाधव हा मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातला आहे. साध्या कुटुंबातून पुढे येत अभिनयक्षेत्र त्यांनी निवडलं. इंजीनियरिंगनंतर त्याने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने सिनेसृष्टीत त्यांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'येड लागलं प्रेमाचं ' या मालिकेत प्रशांत दाजी ही खलनायकी भूमिका त्यांनी साकारली होती. या भूमिकेवर प्रेक्षकांनी त्याच्यावर अक्षरशः प्रेमाचा वर्षाव केला. नंतर तो धर्मवीर 2 चित्रपटातही दिसला. रोहित शेट्टीच्या राकेश मारिया या आगामी हिंदी चित्रपटातही तो दिसणार आहे.स्टार प्रवाहच्या आनंदी मालिकेतील एन्ट्रीमुळे त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का बसलाय.