डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
esakal May 06, 2026 08:45 PM

खारघर (बातमीदार) : डम्परच्या धडकेत २८ वर्षीय वकिलाचा मृत्यू झाला आहे. महेश लोहार हा सोमवारी (ता. ४) सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास मित्रासोबत दुचाकीने जात असताना भरधाव वेगाने आलेल्या डम्परच्या धडकेत महेश याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संशयित डम्परचालकाला ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जोशी यांनी दिली. दरम्यान, खारघर परिसरात राडारोडा, तसेच दगड, रेती वाहून नेणाऱ्या डम्परची संख्या वाढली असून या चालकांच्या वाहन परवान्याची तपासणी वाहतूक पोलिसांनी करावी, अशी मागणी खारघरवासीयांकडून केली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.