swt66.jpg
41774
सावंतवाडी ः नगराध्यक्ष श्रध्दा भोसले यांचे स्वागत करण्यात आले.
सावंतवाडी नगरपालिकेतर्फे
विविध विकासकामांना प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ः शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांच्या हस्ते विविध भागांतील सहा विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात झाले. प्रामुख्याने सांडपाणी निचरा आणि गटार व्यवस्थापनावर भर देत ही कामे हाती घेण्यात आली आहेत. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
खासकीलवाडा येथील गवस पाणंद येथील पाटणकर घराच्या बाजूने असलेल्या नाल्याचे संरक्षक बांधकाम करणे, नाडकर्णी हॉलपासून पुढील गटार प्रणाली बंदिस्त करणे, गजानन सुभेदार यांच्या घरापासून निर्गुण यांच्या घरापर्यंतच्या गटाराची दुरुस्ती, महादेव भाटले, सतीश सावंत ते अशोक सावंत यांच्या घरापर्यंत नवीन गटार बांधकाम करणे, दत्त रेसिडेन्सी गृहनिर्माण संस्थेजवळील शासकीय जागेतील गटार बंदिस्त करून त्यावर लादीकरण (पेव्हिंग) करणे, पार्सेकर घर ते पटेकर घर या दरम्यान नवीन गटार बांधणे आदी कामांचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेविका स्नेहा नाईक, माजी नगरसेवक उदय नाईक उपस्थित होते.