कोल्हापुरात संतापजनक घटना, नराधम पित्यासह मामा अन् अल्पवयीन मामेभावाकडून 5 वर्षांपासून चिमुरडीव
Marathi May 07, 2026 01:25 PM

कोल्हापूर क्राईम न्यूज: महाराष्ट्र राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. कोल्हापुरातून (Kolhapur) आता एक माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्या स्वतःच्या जन्मदात्या पित्यासह, मामा आणि अल्पवयीन मामेभावाने गेल्या पाच वर्षांपासून अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या नराधमांच्या कृत्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असून गेल्या पाच वर्षांपासून तिचा हा शारीरिक छळ सुरू होता. घरातल्याच व्यक्तींकडून वारंवार होणाऱ्या या नराधम कृत्याला पीडिता कंटाळली होती. अखेर, मुलीची सहनशक्ती संपल्यानंतर तिने आपल्या आईला सर्व आपबिती सांगितली.

Kolhapur Crime News: शाहूपुरी पोलिसांकडून दोघांना अटक

या धक्कादायक प्रकाराने हादरलेल्या आईने कोणताही विलंब न लावता आपल्या मुलीला घेऊन थेट शाहूपुरी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना अटक केली आहे. रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनीच असा क्रूर प्रकार केल्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Pune Crime News: पुण्यात थेऊरमध्ये सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न

दरम्यान, पुण्यातूनही अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील थेऊर येथे एका सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पीडित मुलगी ही पुण्यातील रहिवासी असून उन्हाळी सुट्टीसाठी आपल्या आजोबांकडे थेऊर येथे आली होती. याच दरम्यान, आजोबांच्या शेजारी राहणाऱ्या 42 वर्षीय गिरणी चालकाने मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मुलीला आमिष दाखवून जवळ बोलावलं आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. मुलीच्या नातेवाईकांना ही बाब कळल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.  आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

पुणे शहरात तीन महिन्यात पोक्सोचे 50 गुन्हे दाखल

पुणे शहरातील लैंगिक अत्याचारांच्या घटनांबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. नसरापूर आणि पर्वती परिसरातील घटनांनंतर महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण चिंताजनक असल्याचे दिसून आले. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत शहरात पोक्सो कायद्यांतर्गत 50 गुन्हे दाखल झाले आहेत, तर विनयभंगाचे एकूण 149 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. बहुतांश प्रकरणांमध्ये आरोपी हे पीडितांच्या ओळखीतील नातेवाईक किंवा शेजारी असल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा

Pune Crime Parvati Case: पुण्यातील पर्वतीमध्ये आजोबांकडून नातीवर अत्याचाराचा प्रयत्न, ओठांवर, छातीवर ओरखडे अन् जखमा, पोलिसांची माहिती

Pune Parvati Crime News: नातवाला खाऊ आण्यासाठी पाठवलं, पहिले नातीचे, मग स्वत:च्या अंगावरील कपडे काढले, पर्वती परिसरातील महिलेने काय काय बघितलं?

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.