अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांचा कहर! कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदाराला जेसीबीला लटकवून फरफटत नेलं; ट्रॅक्टरखाली चिरडण्याचाही प्रयत्न, नागपुरातील घटना
रजत वशिष्ठ, एबीपी माझा May 07, 2026 02:13 PM

Nagpur Murum Mafia Crime : नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या माफियांचा (Murum Mafia Crime) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर (Revenue Department Team) मुरूम माफियांनी हल्ला तर केलाच, शिवाय जेसीबी थांबवायला जेसीबीवर चढलेल्या नायब तहसीलदाराला जेसीबीवर लटकवून (Nagpur Crime) सुमारे तीन किलोमीटर तशाच स्थितीत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या प्रकरणाने वाळू माफियांची दहशत (Nagpur Crime News) पुन्हा एकदा समोर आली आहे.

Nagpur Murum Mafia Crime : जेसीबीवरून खाली पाडून दुखापत करण्याचाही प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार 5 मे रोजी रात्री सुमारे 11:30 वाजताच्या दरम्यान कुही तालुक्यातील बोरी नाईक परिसर येथे अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांनी महसूल पथकासह घटनास्थळी धाड टाकली. यावेळी कारवाईदरम्यान जेसीबी चालकाने वाहन न थांबवता थेट पळ काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी नायब तहसीलदार निकाळजे हे चालत्या जेसीबीवर ते थांबवण्यासाठी चढले. मात्र, जेसीबी चालकाने जेसीबी न थांबवतात नायब तहसीलदाराला जेसीबीवर लटकलेल्या अवस्थेत तब्बल 3 ते 4 किलोमीटरपर्यंत फरफटत गेले. या प्रकारात नायब तहसीलदाराला चालत्या जेसीबीवरून खाली पाडून दुखापत करण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.

Murum Mafia Crime : आरोपी जेसीबीसोडून पळून गेला, अवैध उत्खनन करणाऱ्यांचे वाढते धाडस

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी जेसीबीसोडून पळून गेला. या प्रकरणी कुही पोलीस ठाणे यांनी कारवाई करत जेसीबी चालक मयूर थोटे याला बुधवारी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैध उत्खनन करणाऱ्यांचे वाढते धाडस पुन्हा एकदा समोर आले आहे.

Rohit Pawar : जेसीबीला लटकवली कायदा व सुव्यवस्था

दरम्यान, याच मुद्दयांवर बोट ठेवत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार भाष्य केलं आहे. गृमंत्री महोदयांच्याच नागपूर जिल्ह्यात जेसीबीला लटकवली कायदा व सुव्यवस्था, अशा शब्दात रोहित पवारांनी टीका केली आहे. राज्यात ना चिमुकल्या मुली सुरक्षित आहे. ना महिला सुरक्षित आहे, ना प्रशासन सुरक्षित आहे. सुरक्षित आहे फक्त सरका, तेही जोपर्यंत जनतेच्या संतापाचा उद्रेक होत नाही तोपर्यंत.! अशा शब्दात रोहित पवारांनी टीका केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 

Pune Parvati Crime News : मी नातीसोबत बसलो होतो, त्या महिलेने अफवा पसरवली; पर्वती अत्याचार प्रकरणातील आजोबांचं कोर्टात निर्लज्जपणे उत्तर

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.