नवी दिल्ली : भारताच्या माजी अंडर-१९ संघातील क्रिकेटपटू अमनप्रीत सिंह गिल (Amanpreet Singh Gill) यांचं बुधवारी चंदीगड येथे वयाच्या अवघ्या ३६व्या वर्षी निधन झालं. अमनप्रीत सिंह गिल (Amanpreet Singh Gill) यांच्या निधनामुळे भारतीय क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे. अमनप्रीत हे भारताच्या अंडर-१९ संघात विराट कोहलीसोबत क्रिकेट खेळले होते. तसेच आयपीएलच्या पहिल्या हंगामात ते किंग्स इलेव्हन पंजाब संघाचाही भाग होते. त्यांच्या निधनावर पंजाब क्रिकेट असोसिएशन आणि माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याने दु:ख व्यक्त केले आहे.(Amanpreet Singh Gill)
अमनप्रीत सिंह गिल (Amanpreet Singh Gill) हे पंजाबकडून मध्यमगती वेगवान गोलंदाज म्हणून खेळत होते. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनी पंजाबसाठी सहा प्रथम श्रेणी सामने खेळताना ११ विकेट्स घेतल्या होत्या. इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात ते किंग्स इलेव्हन पंजाब संघात सहभागी होते. त्यानंतर त्यांनी पंजाब क्रिकेटच्या वरिष्ठ निवड समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले होते. पंजाब क्रिकेट असोसिएशनने सोशल मीडियावर शोक व्यक्त करत म्हटले की, “माजी क्रिकेटपटू आणि वरिष्ठ निवड समितीचे सदस्य अमनप्रीत सिंह गिल यांच्या दु:खद निधनाबद्दल पंजाब क्रिकेट असोसिएशन शोक व्यक्त करत आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि जवळच्या व्यक्तींप्रती आमच्या संवेदना आहेत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि कुटुंबीयांना या कठीण काळात बळ मिळो.”
भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंह यानेही अमनप्रीत यांना श्रद्धांजली वाहिली. “अमनप्रीत सिंह गिल यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झाले. सुरुवातीच्या काळात आम्ही एकत्र ड्रेसिंग रूम शेअर केली होती. ते शांत, मेहनती आणि खेळावर मनापासून प्रेम करणारा क्रिकेटपटू होते. त्याच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत,” असे युवराज सिंह म्हणाला.(Amanpreet Singh Gill) अमनप्रीत गिल यांनी २००७ मध्ये भारतासाठी पाच युवा एकदिवसीय सामने आणि एक युवा कसोटी सामना खेळला होता. दीर्घ स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये त्याने श्रीलंकेच्या थिसारा परेरा यांची विकेटही घेतली होती. मात्र, २००८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकणाऱ्या भारताच्या अंडर-१९ संघात त्यांना स्थान मिळू शकले नव्हते.
Deeply saddened to hear about Amanpreet Singh Gill’s passing. Shared the dressing room in our early days, he was a quiet, hardworking cricketer who loved the game. My heartfelt condolences to his family and loved ones. Rest in peace 🙏🏻 Om Shanti#AmanpreetSinghGill@pcacricket
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) May 6, 2026
दरम्यान, पंजाब किंग्स संघानेही अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावरून शोक व्यक्त केला. “अमनप्रीत सिंह शेरगिल यांच्या निधनामुळे आम्हाला खूप दु:ख झाले आहे. त्यांनी अभिमानाने पंजाबचे प्रतिनिधित्व केले आणि पंजाब किंग्स परिवाराचा भाग राहिले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि संपूर्ण क्रिकेटविश्वाप्रती आमच्या संवेदना आहेत,” असे संघाने म्हटले आहे.
Punjab Cricket Association deeply mourns the sad demise of Amanpreet Singh Gill, former Punjab cricketer and Member, Senior Selection Committee Punjab.
— Punjab Cricket Association (@pcacricket) May 6, 2026
He served Punjab cricket with dedication and passion, representing teams including India Under-19s, Kings XI Punjab and Punjab.… pic.twitter.com/tpr0EwEprk