Maharashtra Politics Live : आज दुपारी 1 वाजता राज्य मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर होणार
Sarkarnama May 08, 2026 11:45 AM
पुण्यात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये तब्बल 300 टक्क्यांनी वाढ

पुणे शहरातील सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये 2023 ते 2024 दरम्यान तब्बल 300 टक्क्यांहून अधिक वाढ होत ती संख्या 1,504 वर गेल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

नाशिक धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार निधा खानला अखेर अटक

नाशिकमधील'TCS' कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खानला अटक करण्यात आली आहे. निदा खानला छत्रपती संभाजी नगरमधून अटक करण्यात आली आहे.

आज दुपारी 1 वाजता राज्य मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज शुक्रवार (ता.०८) रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 01.00 वाजता निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत निकाल जाहीर करण्यापूर्वी सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद देखील घेतली जाणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.