Easy Breakfast Ideas: दररोज नाश्त्यात काय नवीन बनवायचं हा प्रश्न अनेकांना पडतो. अशातच शरीराला पोषण देणारा आणि चवीतही भन्नाट असा पदार्थ हवा असेल, तर शेवग्याच्या पानांचा पराठा एकदम परफेक्ट पर्याय ठरू शकतो. शेवग्याची पानं ही पोषणमूल्यांचा खजिना मानली जातात. यात व्हिटॅमिन A, C, B6, कॅल्शियम, आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. खास म्हणजे हा पराठा मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. दही, लोणचं किंवा गरम चहासोबत याची चव आणखी छान लागते.
साहित्य1 कप गव्हाचं पीठ
¼ कप ताजी शेवग्याची पानं
1 हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
½ टीस्पून ओवा
¼ टीस्पून हळद
चवीनुसार मीठ
1 ते 2 टीस्पून तेल किंवा तूप
आवश्यकतेनुसार पाणी
भाजण्यासाठी तेल किंवा तूप
एका मोठ्या भांड्यात गव्हाचं पीठ घ्या. त्यात शेवग्याची पानं, हिरवी मिरची, ओवा, हळद आणि मीठ घालून एकत्र मिक्स करा.
आता त्यात 1–2 टीस्पून तेल किंवा तूप घालून मिश्रण हलक्या हाताने चोळून घ्या.
थोडं-थोडं पाणी घालत मऊसर पीठ मळून घ्या. पीठ 10 मिनिटं झाकून ठेवा.
तयार पिठाचे छोटे गोळे करून पराठ्यासारखे लाटून घ्या.
मध्यम आचेवर तवा गरम करा आणि त्यावर पराठा भाजा. एका बाजूने हलकं भाजल्यावर पलटवा.
दोन्ही बाजूंना तूप किंवा तेल लावून सोनेरी डाग येईपर्यंत छान भाजून घ्या.
गरमागरम पराठे दही, लोणचं किंवा चहासोबत सर्व्ह करा.
शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात
हाडं मजबूत ठेवण्यास मदत होते
शरीरातील आयर्नची कमतरता कमी करण्यास उपयुक्त
पचनक्रिया सुधारते
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
सकाळच्या धावपळीमध्ये झटपट तयार होणारा आणि आरोग्यासाठी फायदेशीर असा हा शेवग्याच्या पानांचा पराठा नक्की ट्राय करा.
Sattu Paratha : उन्हाळ्यात हलकं आणि चविष्ट खायचंय? नाश्त्यासाठी झटपट तयार करा खास सत्तू पराठा