आळेफाटा : जुन्नर तालुक्यातील आळे खिंड परिसरात एका निर्दयी पित्याने दोन मुलांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. यात साडेतीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून, पाच वर्षांचा मुलगा गंभीर जखमी अवस्थेतून बचावला आहे. आळेफाटा पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे.
Education Success Story: शेतमजूर कुटुंबातील मयुरी लावंडची झेप; बारावीत ८६% गुणांसह कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक, जिद्द आणि मेहनतीचा विजय!पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर सदाशिव शिंदे (वय २९, रा. मोशी, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने मंगळवारी (ता. ५) सकाळी आपली मुले हर्षदा (वय साडेतीन) आणि आर्यन (वय पाच) यांना फिरायला नेण्याच्या बहाण्याने आळे खिंड येथील जंगलात नेले.
तिथे त्याने त्यांचा निर्दयपणे गळा दाबून त्यांना मृत समजून जंगलात फेकून दिले. दरम्यान, बुधवारी सकाळी मुलगा आर्यन शुद्धीवर आला. तो रडतरडत पुणे- नाशिक महामार्गावर पोहोचला. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मुलाकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. त्याने आपले नाव आणि गाव सांगितले.
पोलिसांनी नातेवाइकांना संपर्क साधला असता या मुलाचे आजोबा लक्ष्मण शिंदे नातेवाइकांसह आळेफाटा पोलिस ठाण्याला आले. त्यांनी हा आपलाच नातू असल्याचे सांगितले. आळेफाटा पोलिसांनी मुलगा व नातेवाइकांसह भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
Maharashtra Education News: शिक्षण विभागाचा माेठा निर्णय! शिक्षकांसाठी वार्षिक ५० तास प्रशिक्षण सक्तीचे, गुणवत्तावाढीसाठी सरकारचे पाऊल..पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सागर शिंदे यास चाकण येथून ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने मुलांना आळे खिंड येथील जंगलात गळा दाबून टाकल्याचे सांगितले. आळेफाटा पोलिसांनी त्यास घटनास्थळी आणले. बुधवारी रात्रीच्या वेळी हर्षदा हिचा मृतदेह मिळून आला. सागर यास अटक केली.