Medical Store: महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?
Saam TV May 08, 2026 11:45 AM
Summary -
  • २० मे रोजी महाराष्ट्रातील मेडिकल दुकाने बंद राहणार

  • ऑनलाईन औषध विक्रीविरोधात औषध विक्रेत्यांचे आंदोलन

  • अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने देशव्यापी बंद पुकारला

राज्यातील सर्व नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. २० मे रोजी पुण्यासह राज्यातील सर्व मेडिकल बंद राहणार आहेत. २० मे २०२६ रोजी देशभरातील औषध विक्रेते बंद पाळणार असून महाराष्ट्रासह पुणे शहरातील औषध दुकानदारही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणाऱ्या अव्यवसायिक स्पर्धेविरोधात हा बंद पुकारला आहे.

अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात नियमबाह्य पद्धतीने ऑनलाईन औषधांची विक्री सुरू असून त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी धोका निर्माण होत आहे. तसेच छोट्या औषध विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Medical Education Scam : मेडिकल शिक्षण क्षेत्राला हादरवणारा घोटाळा, महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये कॉलेजांवर धाड

या संदर्भात केंद्र सरकारच्या संबंधित मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. दरम्यान, औषध विक्रेत्यांनी पाळलेल्या देशव्यापी बंददरम्यान सर्व औषध दुकाने बंद ठेवली जाणार असली तरी रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी अत्यावश्यक औषधे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Men Health: चाळीशीनंतर पुरुषांनी ‘हे’ चार Medical चेकअप आवर्जून करा; दुसरी चाचणी सर्वात महत्त्वाची
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.