धावपळीच्या जीवनात अनेकदा ट्रॅफिकमुळे किंवा इतर कारणांमुळे रेल्वे स्टेशनवर पोहोचण्यास उशीर होतो आणि डोळ्यादेखत ट्रेन सुटते. अशा वेळी प्रवाशांची मोठी धावपळ होते आणि तिकिटाचे पैसे वाया गेले, अशी भावना मनात येते.
मात्र, भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेन चुकल्यानंतरही तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे परत मिळवू शकता. तसेच आपली सीट सुरक्षित ठेवू शकता. जर तुमची ट्रेन चुकली असेल, तर तुम्ही तिकिटाच्या रकमेचा परतावा मिळवण्यासाठी TDR (Ticket Deposit Receipt) दाखल करू शकता. ट्रेन सुटण्याच्या नियोजित वेळेपासून १ तासाच्या आत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने TDR फाईल करणे अनिवार्य आहे.
TDR दाखल केल्यावर रेल्वे प्रशासनाकडून पडताळणी केली जाते आणि त्यानंतर साधारणपणे बेस फेअरच्या ५०% रक्कम परतावा म्हणून मिळू शकते. जर ट्रेन नियोजित वेळेपेक्षा ३ तासांहून अधिक उशीर असेल आणि तुम्ही प्रवास न करण्याचा निर्णय घेतला, तर तुम्ही पूर्ण परताव्यासाठी (Full Refund) पात्र असता.
याचा अर्थ असा की, जर तुम्ही टॅक्सी किंवा इतर मार्गाने पुढील स्टेशनवर वेळेत पोहोचलात, तर तुम्ही तुमच्या हक्काच्या सीटवर बसून प्रवास सुरू ठेवू शकता. तुमची कन्फर्म ट्रेन चुकली असेल, तर त्याच तिकिटावर दुसऱ्या कोणत्याही ट्रेनमध्ये (अगदी त्याच मार्गावर जाणाऱ्या) प्रवास करण्याची परवानगी नसते.
असे केल्यास तुम्हाला ‘विना तिकीट प्रवासी’ मानले जाईल. टीटीई तुम्हाला दंड आकारू शकतो आणि वाद घातल्यास रेल्वे कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई किंवा तुरुंगवासाचीही तरतूद आहे. राजधानी, शताब्दी, वंदे भारत यांसारख्या हाय-स्पीड ट्रेन्समध्ये ‘जनरल’ तिकीट श्रेणी नसते.
जर एखादा प्रवासी जनरल तिकीट घेऊन अशा गाड्यांमध्ये चढला, तर त्याला मोठ्या दंडाला सामोरे जावे लागते. दंड भरण्यास नकार दिल्यास रेल्वे पोलीस (GRP/RPF) कठोर कारवाई करू शकतात.
रेल्वे प्रवास करताना नेहमी वेळेच्या किमान ३० मिनिटे आधी स्टेशनवर पोहोचणे फायद्याचे असते. परंतु, आपत्कालीन परिस्थितीत वरील नियमांची माहिती असल्यास तुमचे आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते.