महाड तालुक्यातील प्रतिष्ठेची असलेल्या खरवली काळीज ग्राम पंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. खरवली काळीज ग्राम पंचायतीचे सरपंच चैतन्य म्हामुणकर यांनी आपल्या असंख्य राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केला आहे. रायगड जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी म्हामुणकर यांच्या हातात भगवा झेंडा देत त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांच शिवसेनेत स्वागत केल. श्रीवर्धन, म्हसळा, दिवेआगार येथे एकामागोमाग एक मोठे धक्के शिवसेनेने राष्ट्रवादीला दिले आहेत, काळजी खरवली ग्राम पंचायत राष्ट्रवादीच्या हातुन जाण हा असाच मोठा धक्का मानला जात आहे.
Maharashtra News Live Update: बोरामणी तिहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला बांगलादेश सीमेवर सोलापूर पोलिसांनी पकडलंबोरामणी तिहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी मयत गायत्री यांचा दीर शंकर दत्तात्रय मस्के ऊर्फ पप्पू याला महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बांगलादेश सीमेवरून अटक केलीय.
Maharashtra News Live Update: सोलापुरातील ट्रान्सफॉर्मरला भीषण आग- सोलापुरातील पटवर्धन चौक येथील ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागली..
- सह्याद्री शॉपिंग सेंटर येथील विद्युत मंडळाच्या डीपीला स्पार्किंग झाल्यामुळे आग लागल्याची माहिती
- स्पर्किंगमुळे आग लागल्यानंतर आगीचे रौद्र स्वरूप पाहायला मिळाले
- दरम्यान अग्निशामन दलाच्या एका पंपाने ही आग विझवण्यात आली आहे.
Maharashtra News Live Update: सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा; सूवेंदू होणार बंगालचे अधिकारी, तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्रीतामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये आज मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे. बंगालमध्ये भाजपचे सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तर तामिळनाडूमध्ये थलापती विजय यांनी सत्तास्थापनेच्या आकड्याचे गणित जुळवले असून आज ते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सकाळी ११ वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे.