दहावीचा निकाल जाहीर
दहावीच्या निकालात अनेकांना १०० टक्के गुण
पुण्यातील अनेक विद्यार्थी काठावर पास
अक्षय गवळी, साम टीव्ही प्रतिनिधी
दहावीच्या परीक्षेचा निकाल काल लागला. या निकालात अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेतर काही बहाद्दर असेही निघाले की जे काठावर पास झाले आहेत. एकीकडं पुणे शहराला "शिक्षणाचे माहेरघर" किंवा "विद्येचे माहेरघर" म्हणून ओळखले जाते. मात्र याचं पुण्यातून अनेक विद्यार्थ्यांनी सगळ्याच विषयात 35 पैकी 35 गुण घेऊन पास होण्याचा जणू पराक्रम केलाय.
SSC Result 2026 : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींनीच मारली बाजी; पाहा तुमच्या जिल्ह्याचा निकालआज राज्यतील या पठ्ठ्यांचं मोठं कौतुक होत आहेय. कारण त्यांनी तशी करामतच केली. या विद्यार्थ्यांनी चक्क दहावीच्या परीक्षेत सर्वच विषयात 35 गुण मिळवले. सर्वांचंच लक्ष स्वतःकडे वेधून घेतलेये. पुणे येथील अनेक विद्यार्थ्यांना दहावीत 35 पैकी 35 गुण मिळाल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा होती. विशेष म्हणजे सर्वच विषयांमध्ये या विद्यार्थ्यांना 35 गुण मिळाल्याने सर्वांच लक्ष आपल्याकडे वेधले आहे.
ssc result
पुणे येथील अक्षय बाळासाहेब भालेराव, निकिता अमोल कुचेकर आणि सुशांत मच्छिंद्र रोंगटे या दहावीच्या विद्यार्थ्यांना सर्वच विषयात 35 पैकी 35 गुण मिळाले. अगदी काठावर हे विद्यार्थी पास झाले असून प्रत्येक विषयात 35 मार्क घेऊन पास होण्याचा जणू पराक्रम केलाय. त्यांच्या या काठावरच्या यशाचं सर्वत्र कौतुक आणि मोठी चर्चा होतंये. त्यांच्या निकालाची प्रत सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. दुसरीकडे लातूर जिल्ह्यातील श्रुती दिंगाबर भागानगारे हिला देखील सर्वच विषयात 35 गुण मिळाले.
SSC Result 2026 : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींनीच मारली बाजी; पाहा तुमच्या जिल्ह्याचा निकालराज्यातील शेकडो मुलांनी १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. जवळपास १७९ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. तर दुसरीकडे अनेकांना ३५ टक्के गुण मिळाले आहेत. या विद्यार्थ्यांची सगळीकडे चर्चा होत आहे.
SSC Result 2026 : धाराशिवच्या लेकीनं दहावीत मिळवले १०० पैकी १०० गुण, आता व्हायचंय डॉक्टर, वाचा यशोगाथा