Nida Khan : तर निदा खान कधीच सापडली नसती? या ठिकाणी जाणार होती पळून, 10 दिवसांपूर्वीच… मोठी अपडेट काय?
Tv9 Marathi May 09, 2026 01:45 PM

नाशिकच्या टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण, धर्मांतरणासाठी दबाव या प्रकरणाची राज्यभरात चर्चा आहे. यातील प्रमुख आरोपींपैकी असलेली निदा खान ही अनेक दिवस फरार होती. अखेर तिला छत्रपती संभाजी नगर येथून अटक करण्यात आली. गेले 25 दिवस पोलिसांना गुंगारा देत निदा खान लपून बसली होती, मात्र अखेर गुरूवारी रात्री नाशिक पोलिस आणि छत्रपती संभाजी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत निदा खानला बेड्या ठोकल्या. अटक टाळण्यासाठी तिने अचकपूर्व जामीनासाठी वारंवर अर्ज केला होता, मात्र कोर्टाने अटक टाळल्यावर अखेर तिला अटक करून गजाआड धाडण्यात आलं.

याप्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. गुरूवारी पोलिसांनी निदा खान हिला अटक केली मात्र त्यापूर्वी ती पळून जाण्याच्या तयारीत होती. मिळालेल्या माहितीनुसार , निदा खान ही हैदराबादला पळून जाणार होत, मात्र त्याच तयारीत असलेल्या निदा हिला पोलिसांनी अटक केली. फरार असलेल्या निदा खानच्या शोधासाठी पोलिसांनी अत्यंत गोपनीय आणि शिताफीने मोहीम राबवली असल्याची माहिती समोर आली आहे.

कशी केली अटक ?

निदा खानला अटक करण्यासाठी नाशिक शहर आणि छत्रपती संभाजी नगर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. निदा खान हिला छत्रपती संभाजी नगरच्या नरेगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आलं. सुमारे 10 दिवसांपूर्वी निदा खान ही तिची आई, भाऊ आणि मावशीसोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपासाला वेग दिला.

विशेष म्हणजे, महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी सलग 6 दिवस परिसरात गुप्त पाळत ठेवत निदा खानच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले. पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचत अखेर तिला ताब्यात घेतले. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, संभाजीनगरातून निसटण्यात यश आलं असतं तर निदा खान थेट हैदराबादला जाण्याच्या तयारीत होती. मात्र त्याआधीच पोलिसांनी कारवाई करत तिच्या हालचालींना पूर्णविराम दिला.

निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाचा मोबाईल जप्त

दरम्यान या प्रकरणात एमआयएमच्या नगरसेवकाचे बारा वाजले आहेत. पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल याने निदा खानला आश्रय दिला, असा त्याच्यावर आरोप आहे. पोलिसांनी त्याला या गुन्ह्यात सहआरोपी केलं आहे. एवढंच नव्हे तर निदा खान हिला आश्रय देणाऱ्या या नगरसेवकाचा, मतीन पटेलचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. निदा खानला आश्रय दिल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

मतीन पटेल यांचा मोबाईल जप्त करून त्यांच्या कॉल डिटेल्सची पडताळणी केली जात आहे . निदा खान आणि एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाले आहे का याची देखील करण्यात चौकशी येत आहे . मतीन पटेल यांनी निदा खान हिला आश्रय देताना, त्यांचा एमआयएमच्या वरिष्ठ नेत्यांसोबत संपर्क झाला होता का याची देखील तपासणी केली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.