ज्यावेळी तुम्ही नोकरीच्या शोधात असता तेव्हा तुम्हाला त्या नोकरीसाठी पदासाठी त्या कंपनीत इंटरव्यू द्यावा लागतो. जर इंटरव्यूमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तर समोरच्यांना समाधानकारक वाटली तरच नोकरीसाठी तुमचा विचार केला जातो. त्यासाठी तुम्ही कशी तयारी करावी ते आज आपण समजून घेऊया.
१. कंपनीबद्दल माहिती घ्या
ज्या कंपनीत तुम्ही इंटरव्यूसाठी जाणार असाल त्या कंपनीची माहिती आधी जाणून घ्या. जसे की कंपनी काय काम करते. त्यांची उत्पादने/सेवा कोणत्या आहेत. कंपनीची संस्कृती कशी आहे. कंपनीचे अलीकडील प्रोजेक्टची माहीती मिळवा.
२. स्वतःची ओळख तयार ठेवा
‘तुमच्याबद्दल सांगा’ हा प्रश्न जवळपास प्रत्येक जॉब इंटरव्यूमध्ये विचारला जातो. अशावेळी तुम्ही थोडक्यात तुमचा परिचय करून देणं अपेक्षित असतं. जसे की तुमचे नाव,शिक्षण,अनुभव / कौशल्ये,करिअर उद्दिष्ट
३. सामान्य प्रश्नांची तयारी करून ठेवा. जसे की तुमची पॉझीटीव्ह साईड.
४ तुमचे मायनस पॉईंट काय आहेत? तुम्हाला ही नोकरी का हवी आहे? अशा प्रश्नांची उत्तरे आधीच तयार ठेवा.
५. रिझ्युमी नीट समजून घ्या
तुमच्या रिझ्युमी म्हणजेच नोकरीसाठी केलेल्या अर्जात तुम्ही जे काही लिहिले आहे त्याबद्दल स्पष्ट माहिती द्या. खोटी माहिती टाळा. कंपन्याना स्मार्ट माणसांची गरज असते ओव्हरस्मार्ट माणसे कंपन्यासाठी डोकेदुखी ठरतात. त्यामुळे आपली बाजू मांडताना कमी पण स्पष्ट शब्दांचा वापर करा.
६. योग्य कपडे घाला. इंटरव्यूला जाताना उगाच भडक कपडे वापरू नयेत. स्वच्छ आणि साधे कपडे घालावे. महिला असाल तर साडी, कुर्ता सलवार,किंवा पॅंट शर्ट आणि पुरुष असाल तर फॉर्मल वेअर. तुमचे केस आणि व्यक्तिमत्त्व नीट ठेवा.
चप्पलऐवजी शूज वापरा
७. वेळेवर पोहोचा. मुलाखतीच्या ठिकाणी १०–१५ मिनिटे आधी पोहोचा.
जर तुमचा Online interview असेल तर इंटरनेट आणि कॅमेरा तपासा
7. आत्मविश्वास ठेवा- समोरच्याच्या डोळ्यात डोळे पाहून बोला.
शांतपणे आणि स्पष्ट बोला. घाबरू नका
८. प्रश्न विचारण्याची तयारी ठेवा. मुलाखतीच्या शेवटी तुम्हीही प्रश्न विचारु शकता. अशावेळी गावगप्पा न मारता
कामाचे स्वरूप काय असेल? टीम किती मोठी आहे? ट्रेनिंग मिळेल का?
१०. आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा .
रेझ्युमे, फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्रे,आयडी