मोठी बातमी! थलपती विजय यांना मोठा धक्का, शेवटी अनुभव कमी पडला, तामिळनाडूत मोठा गेम
Tv9 Marathi May 09, 2026 09:45 PM

तामिळनाडूमध्ये अजूनही सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षानं जोरदार मुसंडी मारली. टीव्हीकेला राज्यात सर्वाधिक जागा मिळाल्या. टीव्हीकेला तामिळनाडूमध्ये 108 जागा मिळाल्या मात्र जरी असं असलं तरी देखील टीव्हीके बहुमतापासून दहा जागा दूर राहिला आणि आता तीच सत्ता स्थापनेमध्ये सर्वात मोठी अडचण बनली आहे. थलपती विजय यांच्याकडून तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्यामध्ये त्यांना अजूनही यश मिळालेलं नाही. टीव्हीकेला दहा जगांची आवश्यकता असताना काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे टीव्हीकेकडे 112 सदस्य संख्या झाली. तरी देखील टीव्हीकेला आणखी 6 जागांची गरज होती.

दरम्यान त्यानंतर थलपती विजय यांना सीपीएम, सीपीए या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र दुसरीकडे पाठिंबा देण्याच्या बदल्यामध्ये आता थोल थिरुमावलवन यांची पार्टी असलेल्या विदुथलाई चिरुथाइगल काची (व्हिसीके) पक्षानं थलपती विजय यांच्यापुढे काही अटी ठेवल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. व्हिसीकेकडून पाठिंब्याच्या बदल्यामध्ये उपमुख्यमंत्रिपदासह काही महत्त्वाच्या खात्यांची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व्हिसीके पक्ष उपमुख्यमंत्रिपदावर अडून बसला आहे, उपमुपख्यमंत्रिपद मिळालं तरच आम्ही पाठिंबा देऊ अशी पक्षाची भूमिका आहे.

एवढंच नाही तर थलपती विजय यांनी दोन ठिकाणावरून निवडणूक लढवली होती, ते दोन्ही जागी विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांना आता एका मतदारसंघाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. थलपती विजय हे तिरुचिरापल्ली पूर्व विधासभा मतदारसंघातील सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. या जागेवर देखील व्हिसीकेची नजर आहे. या जागेवरून थोल थिरुमावलवन हे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता थलपती विजय यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत आता व्हिसीके आज सायंकाळी घोषणा करण्याची शक्यता आहे. थलपती विजय यांना बहुमतासााठी आणखी दोन आमदारांची गरज आहे, जर व्हिसीकेने पाठिंबा दिला तर थलपती विजय यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.