RR vs GT: राजस्थानने नाणेफेक जिंकली; गुजरातच्या वाटेला फलंदाजी, कर्णधार गिल म्हणाला…
GH News May 09, 2026 10:10 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 52व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आले आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. राजस्थान रॉयल्सने 10 सामने खेळून 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे 12 गुण आणि +0.510 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे. गुणतालिकेत अशीच स्थिती गुजरात टायटन्सची आहे. गुजरात टायटन्सचा 6 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभव झाला आहे. गुजरात टायटन्सच्या पारड्यात 12 गुण आहेत. पण नेट रनरेट हा राजस्थान रॉयल्सच्या तुलनेत कमी आहे. गुजरात टायटन्सचा नेट रनरेट -0.147 आहे. हा सामना जिंकल्यास राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत पहिलं स्थान, तर गुजरात टायटन्स दुसरं स्थान पटकावून शकते. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार यशस्वी जयस्वाल म्हणाला की, ‘आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. मला वाटते की खेळपट्टी बरीच चांगली आहे. परागच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली आहे, तो लवकरच परत येईल. हेटमायर संघात येत आहे. मी खूप उत्सुक आहे. सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे.’

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, ‘आम्हालाही प्रथम गोलंदाजी करायला आवडले असते. प्रसिद्ध मानवच्या जागी परत येत आहे. मला वाटते की आपल्या बलस्थानांकडे पुन्हा लक्ष देणे महत्त्वाचे आहे. आम्ही काही क्षेत्रांवर विचार केला. आम्ही खेळलेले बहुतेक सामने खूपच अटीतटीचे झाले आहेत. पहिल्या दोन षटकांमध्ये काय होते ते आपण पाहू.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, शुभम दुबे, दासून शनाका, जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, ब्रिजेश शर्मा, यशराज पुंजा.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.