नवलच! कांगारूंचा देश
Marathi May 10, 2026 08:25 AM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

>>अरूण<<

जगात अनेक देश आहेत. मग ऑस्ट्रेलियाची नवलाई कोणती? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात असलेलं ऑस्ट्रेलिया खंड हे पृथ्वीवरचं एक प्राचीन खंड असून ते 76 लाख 88 हजार 287 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचं महाद्वीप किंवा जगातलं सर्वात मोठं बेट आहे. जगातला तो विस्ताराने सहाव्या क्रमाकांचा मोठा देश असून त्याचा भूप्रदेश सर्वत्र सपाट आणि वाळवंटी आहे. या एव्या मोठ्या देशाची लोकसंख्या अवघी 2 कोटी 78 लाख 40 हजार 800 इतकीच, म्हणजे आपल्या महामुंबई आणि दोन-तीन जिल्ह्याएवअसेल. इथली सगळी आधुनिक वसाहत देशाच्या किनारपट्टीवर आहे. हिंद महासागर, पॅसिफिक महासागर आणि आर्क्टिक महासागर हे या द्वीप खंडाच्या भोवतीचे जलनिधी.

ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत अधिक जाणून घेण्याच्या गोष्टी म्हणजे या देशाला चहूबाजूंनी समुद्र असल्याने 10 हजार बीच (चौपाटी) आहेत. त्या ठिकाणी पर्यटनस्थळं असून परदेशी पर्यटक अर्थातच मोठ्या संख्येने तिथे येतात. ऑस्ट्रेलियाचा मध्य भाग पूर्णपणे सपाट वाळवंटाचा असून इथे मोठमोठी पर्जन्यवनं आणि सरोवरं आहेत.

वाळवंटी प्रदेशाची विपुलता असल्याने वाळवंटातील वाहन उंट ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणावर आहेत. या उंटाची निर्यातही हा देश करतो. इथले उंट मध्यपूर्वेतील आखाती देशात पाठवले जातात. ऑस्ट्रेलियातील वाळवंटात आदिवासीचं वास्तव्य असून, त्यांची स्वतंत्र संस्कृती आहे. ही मंडळी आग्नेय (दक्षिणपूर्व) आशियातून 50 ते 65 हजार वर्षांपूर्वी येथे आली. याउलट तिथे आता रुळलेली इंग्लिश संस्कृती गेल्या काही शतकातलीच असून ऑस्ट्रेलिया अजूनही ब्रिटीश राजसत्तेला मानतो.

अंडी घालणाऱ्या केवळ दोनच सस्तन प्राण्यांचं (मॅमल्स) वसतीस्थान असून त्यांची नावं प्लॅटिपस आणि एचिडना. त्यांना जीवशास्त्रात मोनोट्रेमेस म्हणतात. प्लॅटिपसना बदकासारखी चोच असते. एचिडना हे मुंग्याखाऊ प्राण्यांसारखे लांब नाकाचे असतात. या सस्तन प्राण्यांची मादी पिलांना त्वचेतून स्रवणारं दूध पाजते. त्यामुळे सस्तन प्राण्यांच्या उक्रांतीमधले ते 15 कोटी वर्षांपूर्वीचे जीव समजले जातात.

ऑस्ट्रेलिया म्हटलं की, पिलाला ठेवण्याची पिशवी (पाऊच) असणारं कांगारू आठवतं. ऑस्ट्रेलियात कांगारूंची संख्या 5 कोटी आहे. एकूण ऑस्ट्रेलियन लोकसंख्येच्या ती जास्त आहे!

ऑस्ट्रेलिया हे खंड जगातल्या सर्व खंडामध्ये सपाट प्रदेशाचं खंड असून या विशाल खंडात एकही जिवंत (अॅक्टिव्ह) ज्वालामुखी नाही. त्यामुळे त्याला इतर खंडांच्या तुलनेत भूकंपाचं भय कमी आहे. ‘कांगारूं’च्या देशाची ही वैशिष्ट्ये निश्चितच नवलाईची.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.