रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 167 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स विरुद्ध शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आहे. आरसीबीने 1 चेंडूत 2 धावा करत 2 पॉइंट्सची कमाई केली. आरसीबीचा हा एकूण सातवा विजय ठरला. आरसीबीला या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. आरसीबीने मुंबईवर मात करुन पॉइंट्स टेबलमध्ये 3 स्थानांची झेप घेतली.आरसीबी यासह पॉइट्स टेबलमध्ये नंबर 1 टीम ठरली आहे.