RCB vs MI : आरसीबीचा शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय,मुंबईवर 2 विकेट्सने मात
GH News May 11, 2026 03:09 AM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात रविवारी 10 मे रोजी डबल हेडरचा थरार पार पडला. या डबल हेडरमधील पहिल्या आणि एकूण 53 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स टीमने गुजरात टायटन्सला पराभूत करत प्लेऑफच्या दिशेने जबरदस्त वाटचाल सुरु ठेवली आहे. तर डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 167 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने विजयी धावांचा पाठलाग करताना चिवट खेळी केली. त्यामुळे आरसीबीला शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज होती. आरसीबीच्या फलंदाजांनी 2 धावा करत 2 गुणांची कमाई केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.