Watermelon Capital: भारताची ‘वॉटरमेलन कॅपिटल’ ठरलं महाराष्ट्रातील ‘हे’ शहर
Marathi May 11, 2026 02:25 PM




उन्हाळा सुरू झाला की बाजारात लालभडक, रसाळ आणि गार कलिंगडांची रेलचेल पाहायला मिळते. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यात शरीराला थंडावा देणारं हे फळ अनेकांचं पहिलं पसंतीचं ठरतं. पण देशभरात विकलं जाणारं हे गोड कलिंगड नेमकं कुठून येतं, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? महाराष्ट्रातील एक शहर आज देशाची ‘वॉटरमेलन कॅपिटल’ म्हणून ओळख निर्माण करत आहे. उन्हाळा आला की या शहरातील रस्ते, बाजारपेठा आणि शेतं अक्षरशः कलिंगडांनी भरून जातात. (which city is famous for watermelon in india)

सोलापूरची ‘वॉटरमेलन कॅपिटल’ म्हणून ओळख
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा आज देशातील सर्वात मोठ्या कलिंगड उत्पादक भागांपैकी एक मानला जातो. उन्हाळा सुरू होताच सोलापूरमधील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची लागवड पाहायला मिळते. महामार्गांच्या कडेला दूरवर पसरलेली कलिंगडाची शेतं हे इथलं खास आकर्षण बनलं आहे.
राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये विकले जाणारे कलिंगड सोलापूरमधूनच पाठवले जातात. त्यामुळेच सोलापूरला आता भारताची ‘वॉटरमेलन कॅपिटल’ म्हंटल जात आहे.

सोलापूरचं कलिंगड इतकं खास का?
सोलापूरची माती आणि हवामान कलिंगड शेतीसाठी अत्यंत अनुकूल मानलं जातं. इथलं उष्ण वातावरण आणि कडक ऊन कलिंगड लवकर पिकण्यासाठी मदत करतं. त्यामुळे इथली फळं आकाराने मोठी, चवीला गोड आणि जास्त रसाळ असतात. याच कारणामुळे सोलापूरच्या कलिंगडांना केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशातील इतर राज्यांमध्येही मोठी मागणी आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत येथून दररोज शेकडो ट्रक भरून कलिंगड देशभर पाठवले जातात.



© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.