निदा खान एमआयएमच्या बड्या नेत्याची नातेवाईक… या नेत्याला ताबडतोब अटक करा, मंत्री संजय शिरसाट यांनी टाकला बॉम्ब; राजकारणात मोठी खळबळ
Tv9 Marathi May 11, 2026 05:45 PM

नाशिक टीसीएस (TCS case) कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणातील रोज नवीन अपडेट्स समोर येत आहे. अशात मंत्री संजय शिरसाट यांनी मोठा बॉम्ब टाकलं आहे… निदा खान ही एमआयएमच्या बड्या नेत्याची नातेवाईक असल्याचा धक्कादायक खुलासा संजय शिरसाट यांनी केला आहे. ज्यामुळे राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. निदा खान हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, TCS कंपनी प्रकरणात फरार असलेली महिला आरोपी निदा खान हिला अखेर अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. तिला अटक केल्यानंतर संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

संजय शिरसाट म्हणाले, ‘TCS कंपनीमधील प्रकरण फार गंभीर आहे… हे आता सर्वांच्या लक्षात आलंच आहे. निदा खान ही पेड वर्कर आहे… अशा निदा खान जागोजागी फिरत आहे… ‘कश्मिर फाईल्स’सारखा सिनेमा भारतात बनू नये यासाठी काळजी घ्यायला लागेल… मुख्यमंत्र्यांना भेटून SIT ची मागणी करणार आहे… असं देखील शिरसाट म्हणाले.

पुढे एमआयएमच्या बड्या नेत्याचं नाव घेत शिरसाट म्हणाले, ‘निदा खान प्रकरणात नगरसेवक अटकेत आहे. इम्तियाज जलील यांच्या भावाच्या बायकोचे हे सगळे नातेवाईक आहेत. इम्तियाज जलील यांना अटक झाली पाहिजे. एमआयएमच्या सहभागाने हे सगळं घडत आहे. एमआयएमच्याला कोण चालवत आहे का? अशी शंका आहे…’, असं देखील संजय शिरसाट म्हणाले आहेत. यावर अद्याप इम्तियाज जलील यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

संबंधित प्रकरणावर छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. ‘नाशिकच्या आयटी कंपनी मधील धर्मांतर प्रकरणी इम्तियाज जलील असो किंवा कोणी असो या प्रकरणाशी संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी म्हटलं आहे..

नाशिक मधील आयटी कंपनीचे धर्मांतर प्रकरण राज्यभर चांगलंच गाजलं या प्रकरणातील आरोपी असलेली निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर मधून अटक करण्यात आली आणि तिला आश्रय देणारा मतीन पटेलला सुद्धा नाशिक पोलिसांकडून अटक करण्यात आली. तर दुसरीकडे त्याचं घर पाडलं जाणार असल्याची नोटीसही त्याच्या घरावर लावण्यात आली, असून समाधानकारक उत्तर आलं नाही तर त्याच्या घरावर शंभर टक्के बुलडोझर चालवणार असल्याच जंजाळ यांनी म्हटलंय. दरम्यान जे जबरदस्तीने धर्मांतर केलं जातं होतं, यामागे शंभर टक्के एमआयएम पक्ष आहे… हे सिद्ध झालेलं आहे असं म्हणत राजेंद्र जंजाळ यांनी एमआयएम पक्षावर निशाणा साधला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.