ऑफिसला जाताना बॅगमध्ये लॅपटॉप, चार्जर, डबा आणि इतर साहित्यामुळे वजन वाढते. जर ही बॅग योग्य नसेल, तर याचा परिणाम आपल्या खांद्यावर आणि पाठीवर होऊ शकतो. म्हणूनच ऑफिस बॅगची निवड करताना ती केवळ स्टायलिश नसावी, तर ती वापरण्यास सोपी आणि वजनाला हलकी असणे गरजेचे आहे. त्यामुळे बॅग निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे आपण या लेखात पाहणार आहोत.
टोट बॅग्स
हल्ली मुलींमध्ये टोट बॅग्सची जास्त क्रेझ आहे. या बॅग दिसायला आकर्षक असतात परंतू तुमच्याकडे जर जास्त सामान असेल तर यामुळे बॅग जड होऊ शकते. अशी बॅग खांद्याला लावल्याने खांदा दुखू शकतो किंवा एका बाजूला झुकू शकतो. त्यात जर तुम्ही अशी वजनदार बॅग दररोज वापरली तर खांदा किंवा मानदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे टोट बॅग घेणे शक्यतो टाळावे.
टॉप हँडल बॅग्स
सध्या बॅग्सच्या फॅशनमध्ये महिला टॉप हॅन्डल बॅग्सना पसंती देत आहेत. या बॅग एका हातात अडकवता येतात. पण यामुळे हाताचे दुखणे सुरु होऊ शकते. त्यामुळे जास्त वजन असल्यास या बॅग्स एका हातात कॅरी न करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
हेही वाच – Summer Haircut: ‘या’ ट्रेंडी हेअरकटने उन्हाळ्यातही दिसाल कूल
क्रॉस बॅग्स
क्रॉस बॅग्स या बॅग्स आरामदायी असतात. या बॅग्समुळे शारीरिक दुखणे कमी प्रमाणात होते. त्यामुळे क्रॉस बॅग कॅरी करताना त्यातील सामान ठेवण्यात येणारा भाग हा कंबरेच्या उंचीएवढा वर घ्यावा. यामुळे वजनाचं संतुलन योग्य प्रमाणात होतं.
बॅकपॅक
वजनाच्या 5 % पेक्षा अधिक वजनाची बॅग ऑफिसमध्ये नेत असाल तर बॅकपॅक प्रकारच्या बॅगचा पर्याय निवडावा. जास्त वजनासाठी बॅकपॅचा पर्याय उत्तम ठरतो. महत्वाचे म्हणजे वेस्टबँड असलेल्या बॅकपॅकची निवड करावी. यामुळे वजनाचं संतुलन राखण्यास मदत होते.
हेही वाचा – Office Footwear: ऑफिससाठी ‘हे’ फुटवेअर ठरतील परफेक्ट