swt1114.jpg
42802
देवगड : येथे कोळोशी -हडपिड हायस्कूलच्या १९८९९० चे विद्यार्थी स्नेहमेळाव्या निमित्ताने एकत्र आले.
कोळोशी-हडपिड शाळेच्या
विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ११ : माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी-हडपिडच्या १९८९-९० च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल ३६ जूळून आला. यावेळी मित्रमैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेतील अनेक किस्से शेअर करत हास्य विनोदात रंगले.
आपण ज्या शाळेत शिकलो,लहानाचे मोठे झालो. वेगवेगळ्या गावातील विद्यार्थ्यांबरोबर मैत्रीचे नाते जोडले.त्या सर्वांना एकदा भेटावे, हितगुज करावी असे सर्वांनाच वाटत असते. पण संसाराच्या गाडा हाकताना त्या आठवणींवर धूळ जमा होते. मात्र, सध्या सोशल मिडीयाच्या नेटवर्कमुळे अशी लांब गेलेली नाती जवळ येऊ लागली, ही जमेची बाजू आहे. अशाच सोशल मीडीयामुळे हि बॅचसुध्दा एकत्र आली आणि ९ मे म्हणजे तब्बल ३६ वर्षांनी स्नेहमेळाव्याचा योग जुळून आला. या सर्वांनी सकाळी हायस्कूलच्या पाय-यांना वंदन करून कुणकेश्वर चरणी सर्वजन नतमस्तक होऊन मग दिवसभर धमाल मस्ती मजा करत वेळ कसा गेला ते समजलेच नाही.शाळेतील अनेक किस्से सांगत एकत्र जेवनाचा आस्वाद घेतानाचा अनुभव अविस्मरणीय होता. मात्र, सायंकाळी परत एकमेकांना निरोप देताना सगळ्यांना गहिवरून आले.