साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांच्या अर्धशतकी तडाख्यानंतर जेसन होल्डर- कगिसो रबाडा या जोडीने प्रत्येकी 3-3 विकेट्स घेत गुजरात टायटन्सला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवून दिला आहे. गुजरातने आयपीएल 2026 (IPL 2026) स्पर्धेतील 56 व्या सामन्यात हैदराबादसमोर 169 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे हैदराबाद हा सामना जिंकून 2 गुण मिळवेल असं वाटत होतं. मात्र गुजरातच्या गोलंदाजांनी कमाल केली. गुजरातच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने हैदराबादला झटके देत 168 धावांचा यशस्वी बचाव केला.
हैदराबादचं 86 धावांवर पॅकअपहैदराबादला संपूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. गुजरातने हैदराबादला 31 बॉलआधी गुंडाळलं. गुजरातने हैदराबादला 14.5 ओव्हरमध्ये 86 रन्सवर गुंडाळलं. गुजरातने यासह 2 गुण मिळवले. गुजरातचा हा एकूण आठवा आणि सलग पाचवा विजय ठरला. गुजरातचा नरेंद्र मोदी स्टेडियमधील हा 19 व्या मोसमातील 6 सामन्यांतील चौथा विजय ठरला. गुजरातचा हा धावांबाबत सर्वात मोठा विजय ठरला. गुजरातने यासह प्लेऑफमधील आपलं स्थान जवळपास निश्चित केलंय. तर हैदराबादचा हा एकूण चौथा पराभव ठरला.
सामन्यात काय झालं?सनरायझर्स हैदराबादने टॉस जिंकला. कॅप्टन पॅट कमिन्स याने फिल्डिंगचा निर्णय घेत गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हैदराबादच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. गुजरातसाठी दोघांनी अर्धशतक झळकावलं. मात्र त्यानंतरही गुजरातला 170 धावाही करता आल्या नाहीत. गुजरातसाठी ओपनर साई सुदर्शन याने सर्वाधिक 61 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर याने 50 धावांचं योगदान दिलं. निशांत सिंधू याने 22 धावा जोडल्या. त्याव्यतिरिक्त एकाहाती 20 पार पोहचता आलं नाही. हैदराबादसाठी प्रफुल हिंगे आणि साकीब हुसैन या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट मिळवली. तर पॅट कमिन्स याने 1 विकेट घेतली.
स्कोअरकार्ड
हैदराबादची घसरगुंडीविजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या हैदराबादला झटपट झटके दिले. त्यामुळे हैदराबाद जिंकणार नाही हे स्पष्ट होतं. त्यामुळे हैदराबादला धावा करुन पराभवातील अंतर कमी करण्याची संधी होती. मात्र हैदराबादसाठी कुणालाही 20 हा आकडाही गाठता आला नाही. हैदराबादसाठी कॅप्टन पॅट कमिन्स याने सर्वाधिक 19 धावा केल्या. सलील अरोरा 16, हेन्रिक क्लासेन 14 आणि इशान किशन याने 11 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. गुजरातकडून एकूण 5 जणांनी बॉलिंग केली. हे पाचही गोलंदाज यशस्वी ठरले. कगिसो रबाडा आणि जेसन होल्डर या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. इम्पॅक्ट प्लेअर प्रसिध कृष्णा याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर राशिद खान आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवत गुजरातला विजयी करण्यात योगदान दिलं.