Sunil Gavaskar : सूर्यवंशीने धु धु धुतल्यानंतर गावस्करांनी माज दाखवणाऱ्या आकाश सिंहला विचारलं, 'अरे आकाश आता..'
Tv9 Marathi May 20, 2026 05:45 PM

राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात काल सामना झाला. या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सने लखनऊला सात विकेट्सने हरवलं व आयपीएल प्लेऑफ प्रवेशाच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या. या मॅचमध्ये लखनऊचा डावखुरा वेगवान गोलंदाज आकाश सिंहची जोरदार धुलाई झाली. वैभव सूर्यवंशीने त्याला जाम धुतलं. त्याच्या 3 ओव्हरमध्ये 54 धावा लुटल्या. फक्त त्याला एक विकेट मिळाला. या प्रदर्शनानंतर सुनील गावस्कर यांनी आकाश सिंहला भरपूर ट्रोल केलं. त्याच्यावर टीका करण्यात काही कमी ठेवलं नाही. चेन्नई सुपर किंग्स विरूद्धच्या सामन्यात आकाश सिंहने त्याच्या प्रदर्शनाने सर्वांच लक्ष वेधून घेतले होतं. त्याने प्रभावी कामगिरी केली होती. आकाशने चेन्नई विरुद्ध जबरदस्त स्पेल टाकला होता. सीजनच्या आपल्या पहिल्या सामन्यात त्याने 26 धावा देऊन 3 विकेट काढलेले.

CSK विरूद्धच्या सामन्यात विकेट काढल्यानंतर त्याने आपल्या खिशातून एक नोट काढून सेलिब्रेशन केलेलं. नोट म्हणजे कागदाचा तुकडा होता तो. त्या कागदावर लिहिलेलं की, “#Akkionfire-आकाशला माहितीय T20 मॅचमध्ये विकेट कसे घ्यायचे”. या सेलिब्रेशनने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं होतं. त्याचं हे प्रदर्शन खास होतं. कारण त्याने त्याची जुनी फ्रेंचायजी CSK विरुद्ध ही कामगिरी केलेली. त्यानंतर या लेफ्ट आर्म गोलंदाजाने सांगितलं की, कोणाला टार्गेट करण्यासाठी ती नोट नव्हती.

कागद खिशात आहे ना?

मंगळवारी आकाशाला जेव्हा वैभव सूर्यवंशीकडून मार पडत होता, तेव्हा कॉमेंट्री बॉक्समधून गावस्कर यांनी ‘नोट सेलिब्रेशन’वर टोमणा मारला. “आता कुठे गेली चिट तुझी? कागद खिशात आहे ना? तुम्हाला एका ओव्हरमध्ये सहा चेंडू मिळतात. कदाचित एका चेंडूवर तुला विकेट मिळेल. अन्य पाच बॉलवर तुझी धुलाई झाली. 17 चेंडूत 48 धावा दिल्यात” अशा शब्दात गावस्करांनी ट्रोल केलं.

अशा प्रकारच्या सेलिब्रेशनवर टीका

IPL मध्ये हे नोट सेलिब्रेशन अभिषेक शर्माने सुरु केलं होतं. शतक झळकवल्यानंतर अभिषेकने खिशातून एक कागद काढला. मी माझं शतक ऑरें आर्मीला समर्पित करतो असं त्याने लिहिलेलं. CSK चा उर्विल पटेल आणि मुंबई इंडियन्सच्या रघु शर्माने सुद्धा असचं नोट सेलिब्रेशन केलेलं. अनेक माजी क्रिकेटपटुंनी अशा प्रकारच्या सेलिब्रेशनवर टीका केली आहे. डेल स्टेन, अंबाती रायडू आणि मिचेल मॅकलेनघन यांनी खिशात असा कागदाचा तुकडा ठेवण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.