त्या देशात एखादी व्यक्ती भरपूर सोन्याचे दागिने घालून मिरवत असेल तर लोक त्याच्यापासून दूर पळतात. त्याचा आदर करण्याऐवजी लोक त्याला बोलणं टाळतात. म्हणूनच अति सोनंं परिधान करणं या देशांमध्ये अपमान करून घेण्यासारखंच आहे.
युरोपमधील स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क या देशांत अशी प्रथा आहे. तेथे तुम्ही चमचमणारे दागिने परिधान करून तेतील लोकांच्या पुढे गेले तर लोक तुमच्यावर प्रभावित होत नाहीत. तशी परंपराच त्या देशातील लोकांची आहे. सोन्याचे दागिने परिधान करून लोकांना दाखवत फिरणे हा तेथील सर्वात वाईट प्रकार आहे.
तेथे अॅक्सेल सँडेमॉस नावाच्या लेखकाने 1933 साली एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकात समाजातील कोणत्याही व्यक्तीने इतर व्यक्तीपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, असे समजू नये असे सांगण्यात आले होते. या संदेशाने तेथील लोक खूप प्रभावित झाले. आपण सगळे समान आहोत. कोणालाही विशेष अधिकार नाहीत, असे विचार तेथील लोकांच्या मनात घर करून बसलेले आहेत.
म्हणूनच तेथे तुम्ही तुमच्या श्रीमंतीचा बडेजाव मिरवण्याचा प्रयत्न केला तर तुमचे स्वागत करण्याऐवजी, कौतुक करण्याऐवजी लोक तुमच्यापासून दूर पळतात. लोक तुम्हाला बोलणं टाळतात. जास्त दागिने परिधान करून फिरणे हे तेथे अंहाकाराचे प्रतिक मानले जाते.