Saee Tamhankar Marathi Movie On YouTube: उंच खिडक्या .. फिकट रंगाची कौलारू घरं. एक जुना दिवास्तंभ, नारळाची झाडे, निवांत फिरणाऱ्या सायकली आणि एकेकाळाच्या फ्रेंच शहरातून झालेला प्रवास. ही सगळी दृश्य एका मराठी चित्रपटाची आहेत. चित्रपटाच्या नावापासूनच एक फ्रेश अनुभव प्रेक्षकांना मिळतो. सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर,मीना कुलकर्णी, महेश मांजरेकर यांचा एक फिल गुड अप्रतिम 1 तास 51 मिनिटांचा हा चित्रपट तुम्हाला युट्युबवर पाहता येणार आहे. विशेष म्हणजे मराठी मधला हा पहिला असा चित्रपट आहे जो संपूर्णपणे स्मार्टफोनवर चित्रित झाला आहे. मराठी सिनेसृष्टीत नातेसंबंधांवर आधारित अनेक चित्रपट आले मात्र हा चित्रपट एक वेगळा अनुभव देणारा ठरतो. (Saee Tamhankar Movie)
या चित्रपटाचे नाव आहे पाँडिचेरी. सचिन कुंडलकर दिग्दर्शित या चित्रपटात प्रमुख भूमिकेत सई ताम्हणकर आहे. चित्रपटाची कथा तीन वेगवेगळ्या व्यक्तींभोवती फिरते. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काहीतरी हरवलेलं शोधत असतो. कोणी विभक्त नात्याच्या वेदनेत अडकलाय. तर कोणी अपघातानंतर बेपत्ता झालेल्या नवऱ्याच्या प्रतीक्षात जगतोय. तर कोणी आईच्या इच्छे खातर चुकीच्या नात्यात अडकण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.
हा चित्रपट निकिता आणि तिचा मुलगा ईशान यांच्या आयुष्यभोवती फिरतो. निकिता म्हणजेच सई ताम्हणकर होम स्टे चालवत असते.आणि ती टूर गाईड म्हणूनही काम करत असते. बरोबर पाहता सगळं काही ठीक वाटत असलं तरी तिच्या आयुष्यात गैरहजर असणाऱ्या पतीविषयी सतत प्रेक्षकाच्या मनात प्रश्न उभे राहतात. सोबत नवरा नसल्याने तिच्या आईला तिच्याविषयी चिंता वाटत राहते. नवरा सोबत नाही त्यामुळे होम स्टेवर कोणीतरी तिचा गैरफायदा घेईल या भीतीने ती सईच्या पात्राला निकिताला सगळं सोडून तिच्यासोबत घरी राहण्यासाठीही बोलावत असते. पण ती तिथेच राहण्याचा निर्णय घेते. त्याचवेळी तिच्या होम स्टेवर रोहन हा पाहुणा येतो. याची भूमिका वैभव तत्ववादीने साकारली आहे. बघता क्षणी तो प्रेमात पडतो.हळूहळू निकिताशी मैत्री करतो.पण यानंतर एक ट्विस्ट या चित्रपटात येतो.
पॉंडिचेरीच्या रंगीबेरंगी रस्त्यांवरचे वाईड शॉट्स,शांत क्षण आणि पात्रांमधील न बोललेले संवाद या चित्रपटाला एक वेगळी अनुभूती देतात.सिनेमाच्या दुसऱ्या भागात कथा पकड घेते. 15 फेब्रुवारी 2022 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता youtube वरही पाहता येऊ शकतो.