Latest Marathi News Live Update : पेट्रोल-डिझेलचा साठा एक महिन्याचा आहे- छगन भुजबळ
esakal May 20, 2026 08:45 PM
Petrol Live: पेट्रोल-डिझेलचा साठा एक महिन्याचा आहे- छगन भुजबळ

“पेट्रोल-डिझेलचा साठा एक महिन्याचा आहे. इंधन तुटवडा काही शहरांपुरता नाही तर जागतिक प्रश्न आहे. आखाती देशांमधील युद्धामुळे संपूर्ण जगात इंधनाची दरवाढ झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती चांगली आहे. जिथे जिथे पाइपलाइनने गॅसची सुविधा असेल, तिथे आवर्जून अर्ज करा,” असं छगन भुजबळ म्हणाले.

Thane Live: ठाणे रेल्वे स्थानकावरील असुविधेच्या कारणावरून शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांची आगपाखड

ठाणे रेल्वे स्थानकावरील असुविधेच्या कारणावरून शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आक्रमक झाले आहेत. शौचालयाचं काम का झालं नाही? कानाखाली देईन एक.. असं म्हणत त्यांनी ठेकेदाराला धारेवर धरलं. सोबत डीआरएम हिरेन मीना तसंच इतर रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवरदेखील त्यांनी आरडाओरड केली. तुम्ही काम करत नाही आणि जनतेच्या शिव्या आम्हाला खाव्या लागतात, अशा शब्दांत त्यांनी सुनावलं. ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 2 वरील शौचालयाचं काम अनेक महिन्यांपासून अपूर्ण आहे. ते कधी होईल असं विचारलं असता अजून दोन महिने लागतील, असं ठेकेदार म्हणाला. त्यावरून नरेश म्हस्के भडकले.

Thane Live: ठाण्यात सर्व औषध दुकान दारांचा बंदला पाठिंबा

कोरोना काळात औषधांच्या होम डिलिव्हरीसाठी जारी करण्यात आलेल्या जीएसआर 220 (ई) अध्यादेशाचा ऑनलाईन कंपन्यांकडून गैरवापर होत असल्याचा आरोप करत या विरोधात ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने आज देशव्यापी केमिस्टचा बंद पुकारला आहे. ठाण्यात देखील सर्व औषध दुकानांनी बंद पुकारक ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यलयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

Nashik Live : अल्पवयीन मुलीला व्हॉट्सॲपवरून अश्लील संदेश पाठवल्याचा धक्कादायक प्रकार

* देवळाली कॅम्प परिसरात अल्पवयीन मुलीला व्हॉट्सॲपवरून अश्लील संदेश पाठवल्याचा धक्कादायक प्रकार

* नाशिकरोड पोलिसांनी संशयित आरोपी मोहम्मद मोहिद्दीन सैय्यदला घेतलं ताब्यात

* चोरीच्या मोबाईलवरून मुलीला अश्लील मेसेज आणि भेटण्यासाठी बोलावल्याचा आरोप

* बिटको रुग्णालयात दाखल महिलेचा मोबाईल चोरीला गेल्याचे तपासात उघड

* संशयिताने त्याच मोबाईलवरून अन्य महिलेलाही पाठवले अश्लील संदेश

* सम्राट ग्रुप सिग्नल परिसरातून संशयिताला पकडलं, संतप्त नागरिकांकडून आरोपीला मारहाण, पोलिसांकडून पुढील तपास सुरू

Pune Live : पुण्यात लिफ्टमध्ये अडकून सात वर्षीय मुलाचा मृत्यू

पुण्यातील सिंहगड रोड भागात खेळता खेळता लिफ्टमध्ये गेलेल्या 7 वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला आहे.  शिवांश शैलेश धूत असं त्या मुलाचं नाव आहे.

Pandharpur Live : पंढरपूरमध्ये 500 मेडिकल दुकाने बंद

ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात आज पंढरपुरात ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनच्या पंढरपूर शाखेने एक दिवसीय बंद पाळला.पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व केमिस्ट यांनी येथील तहसील कार्यालयाच्या दारात येऊन निदर्शने देखील केली

Dhule Live : धुळे पोलिसांसाठी हेल्मेट सक्ती; नियम मोडल्यास सर्व्हिस बुकमध्ये नोंद

“कायद्याचे रक्षकच नियम पाळत नसतील, तर सर्वसामान्यांना शिस्त कशी लागणार?” या भूमिकेतून धुळे जिल्हा पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. धुळे पोलिस विभागात आजपासून सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे.

Nashik Live : येवल्यात कांद्याचे दर कोसळले, शेतकरी संतप्त

राज्यात कांद्याच्या दराचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून १२३५ रुपये प्रतिक्विंटल दर देण्याची घोषणा केली होती. मात्र या घोषणेनंतरही नाशिक जिल्ह्यातील Yयेवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Dhule Live : धुळे जिल्ह्यात औषध विक्रेत्यांचा मूक मोर्चा; ऑनलाईन औषध विक्रीविरोधात तीव्र आंदोलन

अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या आवाहनानुसार बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून वाढणाऱ्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात आज देशव्यापी बंद पाळण्यात आला. या आंदोलनात धुळे शहर आणि जिल्ह्यातील सुमारे 1800 औषध विक्रेत्यांनी सहभाग घेतल्याची माहिती जिल्हा केमिस्ट असोसिएशनने दिली.

शिरपूर शहरातील औषध विक्रेत्यांनी करवंद नाका येथून तहसील कार्यालयापर्यंत हातात फलक आणि काळ्या पट्ट्या बांधून पायी मूक मोर्चा काढत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

Live : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीसोबत इंधन तुटवड्याच्या चर्चा जोर धरत असताना उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. अफवांमुळे घाबरून जादा प्रमाणात पेट्रोल-डिझेल खरेदी करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या इंधन टंचाईच्या बातम्या विविध ठिकाणी पसरत असल्या तरी नागरिकांनी संयम बाळगावा आणि पॅनिक होऊन इंधन साठवण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Phaltan Live : फलटणमध्ये पुन्हा ‘कोयता गँग’चा धुमाकूळ; जिंती नाका परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

फलटण शहरात पुन्हा एकदा ‘कोयता गँग’ सक्रिय झाल्याचे समोर आले असून जिंती नाका परिसरात काही तरुणांनी भररस्त्यात हातात कोयते घेऊन दहशत निर्माण केल्याची घटना घडली. या प्रकाराचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

माहितीनुसार, सायंकाळच्या वेळी काही तरुणांनी जिंती नाका परिसरात कोयते उगारत रस्त्यावर गोंधळ घातला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांमध्ये घबराट पसरली होती. भीतीमुळे काही वाहनचालकांनी आपला मार्गही बदलल्याचे सांगितले जात आहे.

Kolhapur Live: कोल्हापुरात साडेचार हजार मेडिकल बंद

मेडिकल बंदला कोल्हापुरात मोठा प्रतिसाद

आज कोल्हापुरात साडेचार हजार मेडिकल बंद

Nashik Live: उन्हाळ्याचा दूध डेअरी व्यवसायाला फटका; दूध खराब होऊन उखरड्यावर फेकण्याची वेळ

गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तीव्र उष्णतेचा फटका आता दूध डेअरी व्यवसायिकांना बसू लागला आहे नाशिकच्या लासलगाव परिसरातील तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेल्याने दूध साठवण आणि वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होत असून, दूध खराब होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे खराब झालेले दूध उखरड्यावर फेकण्याची वेळ आल्याने डेअरी चालक आणि दूध व्यवसायिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Yawatmal Live: यवतमाळमध्ये औषध विक्रेत्यांचा मोर्चा

यवतमाळ शहरात केमिस्ट अॅड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने भव्य मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. ऑनलाईन औषधी विक्रीवर बंदी घालावी,स्थानिक औषध विक्रेत्यांचे संरक्षण करावे आदी मागण्यांसाठी शहरातील प्रमुख मार्गाने मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने औषध विक्रेते सहभागी झाले होते. प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

Nashik Live : मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी

ऑनलाइन औषध विक्रीविरोधात केमिस्ट संघटना आक्रमक

मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास बेमुदत संपाचा इशारा

नाशिक शहरातील शंभर टक्के मेडिकल दुकाने आज बंद

Akola live : अकोला-शेगाव रस्त्यावर ट्रॅव्हल्सने घेतला पेट

 बाळापूर-शेगाव रस्त्यावरील 'स्वस्थीक ट्रँव्हलस'ची बस ही इंदौर वरुन अकोला येत होती. या बस खाली टुव्हीलर येऊन बसचे टायर फुटले आणि टुव्हीलर बस खाली अडकल्याने ट्रॅव्हल्सने पेट घेतला.

Jalna live : जालना जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही इंधन तुटवडा

जालना जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही इंधन तुटवडा

जालना शहरातील एसआरपीएफच्या पंपावर नो स्टॉकचे फलक

chhatrapati SamabhajiNagar Live : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने बैलगाडी मोर्चा काढून आंदोलन सुरु केले आहे.

Pune Live : पुण्यातील बिबवेवाडी परिसरात तरुणाची हत्या

वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाचा गोळ्या घालून खून. बालाजी नगर येथील धक्कादायक घटना

Nagpur Live ३० जूनपर्यंतच संधी; HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर १ जुलैपासून कडक कारवाई

नागपुरातील २०१९ पूर्वीच्या वाहनांसाठी  HSRP नंबर प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले असून यासाठी ३० जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अनेक वाहनधारकांकडून दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. शहरातील सुमारे ८ लाख ७२ हजार वाहनांपैकी फक्त ४ लाख ३६ हजार वाहनांवरच उ HSRP नंबर प्लेट बसवण्यात आली असून तब्बल ४ लाख ३५ हजार वाहने अजूनही नंबर प्लेट आहेत. नागपूर शहर प्रादेशिक परिवहन विभाग क्षेत्रात २ लाख १० हजार तर पूर्व नागपूर विभागात २ लाख २६ हजार वाहनांवर ही नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. दरम्यान, हजारो वाहनधारकांनी नंबर प्लेटसाठी नोंदणी केली असून मुदत संपल्यानंतर विनाक्रमांक नंबर प्लेट वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Chhatrapati Sambhajinagar Live गोवा-हैदराबाद विमानसेवा तात्पुरती बंद, पर्यटन आणि उद्योग क्षेत्राला फटका

छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून सुरू असलेली दुपारची गोवा आणि सायंकाळची हैदराबाद विमानसेवा १६ जूनपासून ३० सप्टेंबरपर्यंत तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पर्यटननगरी आणि उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराच्या अर्थचक्रावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रवासी तसेच पर्यटकांच्या संख्येत घट होण्याची भीती निर्माण झाली असून वाढते इंधनदर आणि वाढलेला संचालन खर्च ही यामागील प्रमुख कारणे असल्याची चर्चा सुरू आहे.

Kolhapur Live औषध विक्रेत्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

देशभरातील औषध विक्रेत्यांच्या संपात कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार हजार दुकानदार सहभागी झाले असून मध्यरात्रीपासून सर्व औषध दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. जिल्हा औषध विक्रेते संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. ऑनलाईन औषध विक्री आणि मोठ्या कंपन्यांकडून निर्माण होणाऱ्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात हा देशव्यापी बंद पुकारण्यात आला असून कोल्हापुरातील औषध विक्रेत्यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

Nanded News सायकल वापरा, कमी अंतरावर पायी जा; नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचा सल्ला

नांदेड जिल्ह्यात देखील इंधन टंचाईची झळ वाहनधारकांना सोसावी लागतीये. नांदेडमध्ये अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा साठा संपला, त्यामुळे वाहनधारकांची मोठी परवड होत आहे.मात्र तरीही नांदेडमध्ये इंधन साठा समाधानकारक असल्याचा दावा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केला. डिझेल , पेट्रोल घेण्यासाठी कॅन आणि भांडे घेऊन जाऊ नका असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.तसच प्रधानमंत्री यांनी जे आवाहन केले त्या नुसार ज्या ठिकाणी सायकलने जाऊ शकता , किंवा कमी अंतर असेल तर पायी जाऊ शकता तर या आवाहनाला प्रतिसाद द्या , इंधन जपून वापरा असा अजब सल्ला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला

Nagpur News नागपुरात २४ तासात ३ बेवारस मृत्यू, उष्माघाताचे बळी?

- गेल्या 24 तासात नागपूर शहरात तीन व्यक्तींच्या मृत्यूची नोंद झालीय... हे मृत्यू उष्माघाताने झाले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहेय...

- गेल्या 24 तासात नागपुरातील तापमानात प्रचंड वाढ झाली असून मंगळवारी नागपूरचा पारा 45.5 अंशावर पोहोचला

- अशात लकडगंज, गणेशपेठ आणि राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना हे मृतदेह बेवारस अवस्थेत आढळले

Jalna News डिझेल मिळेना, शेती संकटात; जालन्यात पेट्रोल पंपांवर गर्दी

जालना जिल्ह्यातील पेट्रोलपंपांवर नागरिकांची तुफान गर्दी जालना जिल्ह्यातील पेट्रोलपंपांवर नागरिकांची तुफान गर्दी, डिझेल खरेदीसाठी शेतकरी कॅन घेऊन रांगेत उभाच.... जालना मंठा रोडवरील सिंधी काळेगाव परिसरातील पेट्रोल पंपावर डिझेल खरेदीसाठी नागरिकांची गर्दी.. डिझेल भेटत नाही शेतीचे कामे पूर्ण होणार नाही शेतकऱ्यांनी कसं जगायचं सरकारला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतो शेतकऱ्यांचा संताप..

Medical Bandh : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात एक दिवसीय देशव्यापी बंद

बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून निर्माण होत असलेल्या अन्यायकारक स्पर्धेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने (AIOCD) आज एक दिवसीय देशव्यापी बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्रासह देशभरात मेडिकल दुकाने बंद आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.