…तर आम्ही जागतिक महायुद्ध सुरू करु! इराणच्या IRGC चा निर्वाणीचा इशारा
Marathi May 21, 2026 02:24 AM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणवर सातत्याने दबाव टाकण्यात येत आहे. तसेच ट्रम्प अनेकदा धमक्या देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर इराणच्या लष्कराने इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) अमेरिकेला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

आपल्या अधिकृत ‘सेपाह न्यूज’ प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात, IRGC ने म्हटले आहे की, जर इराणवर पुन्हा हल्ला झाला, तर यापुढे होणारे युद्ध फक्त आखाती देशांपुरते मर्यादित राहणार नाही. ते युद्ध जगभरात पसरेल आणि जागतिक महायुद्धाचे स्वरुप घेईल. इराण सर्व शत्रूंवर विनाशकारी हल्ले करत त्यांना चिरडून टाकेल.

अमेरिका आणि इस्रायलकडून नवीन लष्करी कारवाईच्या संकेतानंतर इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने (आयआरजीसी) कठोर शब्दांत इशारा दिला आहे. आयआरजीसीने म्हटले आहे की, जर इराणवर पुन्हा हल्ला झाला, तर युद्ध केवळ मध्य-पूर्वेपुरते मर्यादित राहणार नाही. त्याला जागतिक महायुद्धाचे स्वरुप येईल.

तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धानंतर सध्या परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असताना हे विधान आले आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये, अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अणुसुविधा, लष्करी तळ आणि उच्च नेतृत्वाला लक्ष्य करून मोठे हवाई हल्ले केले. प्रत्युत्तरादाखल, इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. त्यामुळे आखाती देशांना युद्धाच्या झळा सोसाव्या लागल्या.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इराणी अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, त्यांचा क्षेपणास्त्र कार्यक्रम, आण्विक क्षमता आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नियंत्रण हे देशाच्या वैचारिक आणि सामरिक ओळखीचा भाग आहेत. त्यामुळे या मुद्द्यांवर माघार घेणे ही तडजोड नसून ‘शरणागती’ ठरेल. त्यामुळे या मुद्द्यांवर माघार घेण्यास इराण तयार नाही. त्यामुळे अद्याप तणाव कायम आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.