Chanakya Niti : या चार जणांपासून नेहमी सावध रहा, अन्यथा घात झालाच म्हणून समजा, मृत्यू देखील होऊ शकतो
Tv9 Marathi May 21, 2026 02:45 AM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यानी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात या जगात चार अशा गोष्टी आहेत, त्यांच्यापासून तुम्ही नेहमी सावध राहिलं पाहिजे, त्यांच्याशी कधीही जवळीक करू नका, तुम्ही जर त्यांच्याशी जवळीक केली तर ती तुम्हाला महागात पडू शकते. चाणक्य पुढे असेही म्हणतात की तुम्ही जर त्यांच्याशी मैत्री केली तर कदाचित काही काळ तुम्हाला मान-सन्मान देखील प्राप्त होऊ शकतो, मात्र तुमचं थोडं जरी दुर्लक्ष झालं, किंवा तुम्ही चुकलात तर मात्र तुमच्या मृत्यू देखील होऊ शकतो, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

राजा – चाणक्य म्हणतात कधीही राजासोबत मित्रता करू नका, कारण तुम्ही जेव्हा राजासोबत मित्रता करता तेव्हा तुमच्या मान-सन्मानामध्ये वाढ होते, लोक तुमचा आदर-सत्कार करू लागतात. परंतु राजाला कधी राग येईल याचा काही भरोसा नसतो, राजाला राग आला तर तो तुम्हाला मृत्यदंडाची देखील शिक्षा सुनावू शकतो, त्यामुळे नेहमी राजापासून दूर रहावे असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

सिंह – चाणक्य म्हणतात सिंहासोबत कधीही मैत्री करू नये, किंवा त्याच्याजवळ जाऊ नये. जर तुम्ही सिंहाच्या जवळ गेलात तर तो त्याच्या स्वभावानुसार तुमच्यावर हल्ला करणार म्हणजे करणार त्यामध्ये तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही सिंहाच्या कधीही जवळ जाऊ नका.

रागीट व्यक्ती -चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीला लगेच राग येतो, अशा व्यक्तीसोबत कधीही मैत्री करू नका, त्याला जर तुमचा राग आला तर तो तुमच्यावर देखील हल्ला करू शकतो.

शस्त्र असलेली व्यक्ती – चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीच्या हाती शस्त्र आहे, अशा व्यक्तीच्या जवळ जाऊ नका, त्याच्यापासून योग्य तेवढं अतंर ठेवा

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.