Cockroach Janta Party नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अभिजीत दीपके यांच्याकडून इन्स्टाग्रामवर कॉकरोच जनता पार्टीची स्थापना करण्यात आली होती. सध्या या अकाऊंटच्या फॉलोअर्सची संख्या 18 मिलियन वर पोहोचली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या एक्स खात्याच्या फॉलोअर्सची संख्या 90 हजारांवर पोहोचली आहे.
सोशल मीडियावरील रिषी बागरी आणि भाजप नेते तेजिंदर बग्गा यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या फॉलोअर्सपैकी बहुतांश फॉलोअर्स पाकिस्तानचे असल्याचा दावा केला होता. या दाव्याला अभिजीत दीपके यांच्याकडून उत्तर देण्यात आलं आहे. अभिजीत दीपके यांनी एक्सवर पोस्ट करत फॉलोअर्स संदर्भात माहिती दिली आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे 94 टक्के फॉलोअर्स भारतातील असल्याचं अभिजीत दीपके यांनी शेअर केलेल्या फोटोत दिसून येतं.
यानंतर अमेरिकेतील 1 टक्के, यूकेतील 0.7 टक्के, कॅनडा आणि यूएईत 0.6 टक्के फॉलोअर्स आहेत.
अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना म्हटलं की मला माहिती आहे तुम्ही अकाऊंट हॅक करण्यासाठी आतर झाला आहात. तुम्ही त्यात अपयशी ठरला आहात. मी खरी आकडेवारी शेअर करत आहे. तुम्ही 94 टक्के भारतीय तरुणांना पाकिस्तानी का म्हणताय, असं अभिजीत दीपके यांनी म्हटलं.
I know you are desperately trying to hack the account but since you have failed to do so. Let me share the real data.
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) May 21, 2026
Why would you call 94% of Indian youth as Pakistanis? https://t.co/547NtEP934 pic.twitter.com/9DRTx6l96e
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असलेले महाराष्ट्रातील एक डिजिटल मीडिया आणि राजकीय संवाद रणनीतीकार आहेत. अभिजीत दीपके सध्या अमेरिकेत असून त्यांनी सुरु केलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय.
कॉकरोच जनता पार्टीचे एक्स खातं भारतात बंद करण्यात आल्यानंतर अभिजीत दीपके यांच्याकडून नवं खातं सुरु करण्यात आलं आहे. नव्या खात्याला देखील चांगला प्रतिसाद एक्स प्लॅटफॉर्मवर मिळत आहे. इन्स्टाग्रामवर कॉकरोच जनता पार्टीच्या फॉलोअर्सची संख्या वेगानं वाढत आहे. इन्स्टाग्रामवर कॉकरोच जनता पार्टीच्या फॉलोअर्सची संख्या 16 मिलियन्सवर पोहोचलीय. म्हणजेच फॉलोअर्सची संख्या 1 कोटी 80 लाखांवर पोहोचली आहे.