गुजरात टायटन्सने टॉप 3 फलंदाजांनी केलेल्या चाबूक खेळीच्या जोरावर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्ससमोर 230 रन्सचं आव्हान ठेवलं आहे. गुजरातने चेन्नई विरुद्ध आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 66 व्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 229 रन्स केल्या. गुजरातसाठी कॅप्टन शुबमन गिल, ओपनर साई सुदर्शन आणि जोस बटलर या तिघांनी सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे आता गुजरात सामना जिंकून टॉप 2 मध्ये कायम राखणार की चेन्नई विजय मिळवून प्लेऑफमधील आव्हान कायम राखणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पहिल्या डावात काय झालं?चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने टॉस जिंकून गुजरात टायटन्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. गुजरातने या संधीचा पूर्ण फायदा घेत धमाका केला. कॅप्टन शुबमन गिल आणि साई सुदर्शन या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. साईने या दरम्यान सलग पाचवं अर्धशतक झळकावलं. सलामी जोडीने केलेल्या झंझावाती खेळीमुळे गुजरातला भक्कम सुरुवात मिळाली. या सुरुवातीचा तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी आलेला अनुभवी फलंदाज जोस बटलर याने फायदा घेतला. जोसने नाबाद अर्धशतक झळकावून गुजरातला 220 पार पोहचवण्यात योगदान दिलं.
गुजरातची बॅटिंगसाई आणि शुबमन या दोघांनी 10 च्या रन रेटने शतकी भागीदारी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 12.2 ओव्हरमध्ये 125 रन्स केल्या. गुजरातने शुबमनच्या रुपात पहिली विकेट गमावली. शुबमनने 37 बॉलमध्ये 172.97 च्या स्ट्राईक रेटने 64 रन्स केल्या.
शुबमननंतर जोस बटलर या दोघांनी चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 36 बॉलमध्ये 82 रन्स जोडल्या. त्यानंतर साई आऊट झाला. साईला शतकाची संधी होती. मात्र साईने शतकापेक्षा फटकेबाजीला प्राधान्य दिलं. साईने 53 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 7 फोरसह सर्वाधिक 84 रन्स केल्या. राहुल तेवतिया याला भोपळाही फोडता आला नाही. वॉशिंग्टन सुंदर याने 7 धावा जोडल्या. तर जोस नाबाद परतला. जोसने 27 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 5 फोरसह नॉट आऊट 57 रन्स केल्या. चेन्नईसाठी मुकेश चौधरी, स्पेन्सर जॉन्सन आणि अंशुल कंबोज या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
लाईव्ह स्कोअरकार्ड
चेन्नई गुजरातचा हिशोब करणार?दरम्यान दोन्ही संघांची या मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. याआधीच्या सामन्यात गुजरातने चेन्नईवर मात केली होती. त्यामुळे चेन्नई हा सामना जिंकून प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्यासह गुजरातचा हिशोब करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.