एसरने भारतात त्यांचा नवीन एआय लॅपटॉप Acer Aspire 5 AI लाँच केला आहे. या लॅपटॉपमध्ये पातळ आणि हलके डिझाइन असून यामध्ये इंटेल कोअर अल्ट्रा 7 प्रोसेसरला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे की, हे डिव्हाइस उत्पादकता, कंटेंट पाहणे आणि हलक्या गेमिंगसाठी डिझाइन केले आहे. या लॅपटॉपमध्ये कोपायलट+ फीचर्स, 14-इंचाचा WUXGA डिस्प्ले आणि 32 जीबी पर्यंत रॅम आहे.चला तर मग आजच्या लेखात या लॅपटॉपची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.
भारतात Acer Aspire 5 AI लॅपटॉपची किंमत
एसर एस्पायर 5 एआयची किंमत 79 हजार 999 रूपयांपासून सुरू होते. हा लॅपटॉप सिल्व्हर रंगात उपलब्ध आहे आणि त्याची विक्री एसर स्टोअर्स, ॲमेझॉन, क्रोमा, रिलायन्स डिजिटल आणि विजय सेल्स मार्फत केली जाईल.
एसर एस्पायर 5 एआय मध्ये 1920×1200 पिक्सेल रिझोल्यूशनचा 14-इंचाचा WUXGA IPS डिस्प्ले आहे. हा लॅपटॉप 16:10 आस्पेक्ट रेशोसह येतो, ज्यामुळे स्क्रीन वर कंटेंट पाहण्याा आकर्षक अनुभव मिळतो. कंपनीने यात एसर कॉम्फीव्ह्यू समावेश केला आहे, जे दीर्घकाळ वापरादरम्यान डोळ्यांवरील ताण कमी करण्यास मदत करते.
या लॅपटॉपच्या डिझाइनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास हा लॅपटॉप खूपच पातळ आणि वजनाने हलका आहे. त्याचे वजन अंदाजे 1.2 किलोग्राम आहे आणि यात 180-डिग्रीचा हिंज आहे, ज्यामुळे स्क्रीन आरामात फ्लॅटमोड मध्ये उघडता येते.
एसरने हा लॅपटॉप इंटेल कोर अल्ट्रा 5 आणि इंटेल कोर अल्ट्रा 7 एच-सिरीज प्रोसेसरसह सादर केला आहे. एका व्हेरिएंटमध्ये इंटेल कोर अल्ट्रा 5 125H चिप असून, त्याचा बेस क्लॉक स्पीड 3.6GHz आणि बूस्ट स्पीड 4.5GHz पर्यंत आहे. हा लॅपटॉप विंडोज 11 होमवर चालतो आणि कोपायलट+ पीसी म्हणून उपलब्ध आहे. यात 32GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 1TB पर्यंत PCIe Gen 4 NVMe SSD स्टोरेजला सपोर्ट आहे. व्हिडिओ कॉलिंगसाठी, यात फुल एचडी वेबकॅम, प्रायव्हसी शटर आणि बिल्ट-इन मायक्रोफोन आहे. तसेच यात ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स आणि एचडी ऑडिओ सपोर्ट देखील आहे.
एसर एस्पायर 5 एआय मध्ये 53.8Wh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी असून ती 65W यूएसबी टाइप-सी चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये वाय-फाय 6 आणि ब्लूटूथ 5.1 यांचा समावेश आहे. या लॅपटॉपमध्ये दोन यूएसबी टाइप-सी पोर्ट, तीन यूएसबी टाइप-ए पोर्ट, एक एचडीएमआय पोर्ट, एक एसडी कार्ड रीडर आणि एक 3.5mm हेडफोन जॅक आहे. बॅकलिट कीबोर्डमध्ये एक स्वतंत्र कोपायलट बटण देखील आहे.