बॉलिवूड सोडून थेट अमेरिकन शोमधून महिमा चौधरीच्या मुलीचा डेब्यू? 'तो' फोटो पाहून कन्फ्युज फॅन्स
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क May 22, 2026 11:43 AM

Mahima Chaudhry Daughter Look Alike Hollywood Star: नव्वदच्या दशकातली सुपरस्टार अभिनेत्री (Bollywood Actress) जी आजही अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे, ती म्हणजे, महिमा चौधरी (Mahima Chaudhry). आपल्या अभिनयानं तर ही अभिनेत्री भूरळ घालतेच, पण हिच्या सौंदर्याची बात काही औरच. बऱ्याच काळ सिनेसृष्टीतून ब्रेक घेतल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच तिनं एका बॉलिवूड सिनेमातून (Bollywood Movies) कमबॅक केलेलं. पण, त्या सिनेमाची जादू फारशी बॉक्स ऑफिसवर चालली नाही. पण, आता महिमा चौधरी नाहीतर तिची मुलगी भलतीच चर्चेत आली आहे. महिमाची मुलगी अरियाना चौधरी (Arina Chaudhry) हिनं फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अरियाना बॉलिवूड (Bollywood News) नाहीतर हॉलिवूडमधून (Hollywood News) डेब्यू केल्याचं बोललं जातंय. 

सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. ज्यावरून महिमाची मुलगी अरियाना हिनं सिनेसृष्टीत एंट्री घेतल्याचं म्हटलं जातंय. अरियाना हिनं एका लोकप्रिय सीरिजमधून अभिनयात पदार्पण केल्याची चर्चा होत आहे. पोस्टर पाहून अनेकांनी असा अंदाज लावलाय की, महिमा चौधरीच्या मुलीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. इतकंच नाही तर, काहींनी तर ती लोकप्रिय मालिका 'ऑफ कॅम्पस'ची नवी हिरोईन बनली आहे, असंही म्हणायला सुरुवात केली. 

प्राईम व्हिडीओची (Prime Video) नवी सीरिज 'ऑफ कँपस' (Off Campus) सध्या चर्चेत आली आहे. या सीरिजचा प्रीमियर 13 मे रोजी झालेला आणि तेव्हापासूनच ही सीरिज सोशल मीडियावर प्रचंड गाजतेय. चाहते या सीरिजशी संबंधित विविध 'एडिट्स', क्लिप्स आणि प्रतिक्रिया सातत्यानं शेअर करत आहेत. 'ऑफ कैंपस' (Off Campus) मधील मुख्य जोडी, हॅना वेल्स (एला ब्राइट हिने साकारलेली) आणि गॅरेट ग्रॅहम (बेलमॉन्ट कॅमेली याने साकारलेला), यांच्यातील जबरदस्त 'केमिस्ट्री'नं प्रेक्षकांची मनं पूर्णपणे जिंकून घेतली आहेत. मात्र, भारतात मात्र एक पूर्णपणे वेगळंच पात्र लोकांचं लक्ष वेधून घेतंय.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AYUSHI TYAGI (@ayushiiiaye)

लेखिका 'एल केनेडी' यांच्या सर्वाधिक खप असलेल्या पुस्तकांच्या सीरिजवर आधारित, Off Campus ही सीरिज महाविद्यालयीन विद्यार्थी असलेल्या हॅना आणि गॅरेट यांच्या प्रेमकथेचं चित्रण करते. या दोघांचे एकमेकांवर प्रेम जडते आणि त्यानंतर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. तरुण कलाकार एला ब्राइट आणि बेलमॉन्ट कॅमेली यांनी या मालिकेत उत्कृष्ट अभिनय केला आहे. तरीही, या मालिकेत आणखी एक पात्र असं आहे, ज्यानं भारतीय प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे. हीच अभिनेत्री महिमा चौधरीची मुलगी अरियाना चौधरी असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण, ती अरियाना नसून अभिनेत्री मिका अब्दुल्ला (Mika Abdalla) आहे. जिनं सीरिजमध्ये 'ॲली हेस' ही भूमिका साकारली आहे.

सीरिजमध्ये दिसणारी ती महिमा चौधरीची मुलगी अरियाना?

'ऑफ कँपस' (Off Campus) पाहताना अनेक भारतीय प्रेक्षकांच्या लक्षात आलं की, मिका अब्दुल्ला आणि बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी यांच्यात विलक्षण साम्य आहे. मग नेटकऱ्यांनी दोघींच्या दिसण्याची तुलना केली. यामुळे महिमा चौधरी यांच्या तरुणपणीच्या रूपाबद्दलची जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. काहींना मिकाला पाहून असं वाटलं की, अरे ही तर महिमा चौधरीची मुलगी, अरियाना चौधरी आहे. मिका अब्दुल्ला आणि अरियाना चौधरी यांच्या चेहऱ्यातही खूपच साम्य आहे. त्यामुळे मिकाचा फोटो महिमा चौधरी यांची मुलगी अरियाना चौधरीच्या नावानं व्हायरल होऊ लागला. 

मीका अब्दुल्ला कोण? (Who Is Mika Abdalla?)

मीका अब्दुल्ला ही अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल असून, सध्या Off Campus सीरिजमुळे चर्चेत आली आहे. या सीरिजमध्ये तिनं 'अॅली हेयस' (Allie Hayes) ही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अॅली ही सीरिजमधील मुख्य पात्र हॅना वेल्सची जिवलग मैत्रीण आणि रूममेट दाखवण्यात आली आहे. अमेरिकन कॉलेज जीवन, मैत्री आणि प्रेमसंबंधांवर आधारित असलेल्या या रोमँटिक ड्रामा मालिकेत बेलमाँट कॅमेली, स्टीफन कुलिन आणि जेलन थॉमस ब्रुक्स यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. लुईसा लेवी (Louisa Levy) यांनी निर्मित केलेली ही मालिका एका संगीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी आणि विद्यापीठातील लोकप्रिय हॉकीपटू यांच्यात फुलणाऱ्या प्रेमकथेवर आधारित आहे.

'ऑफ कॅम्पस' सध्या Amazon Prime Video वर प्रदर्शित होत असून, तरुण प्रेक्षकांकडून या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळतोय. मीका अब्दुल्लाच्या अभिनयाचंही विशेष कौतुक केलं जात आहे.

Dhurandhar Singer Jasmine Sandlas Concert Accident: 'धुरंधर' फेम गायिकेच्या कॉन्सर्टमध्ये अपघात, अचानक बॅरिकेट्स कोसळल्यानं एकच गदारोळ, धडाधड पडले प्रेक्षक VIDEO

ABP माझाच्या बातम्या LIVE...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.